सहा लढती जिंकत प्लेऑफचे समीकरण फिरविले, पण केकेआरला टॉप चारसाठी किती संधी ?

IPL 2026- शेवटच्या सात सामन्यात तब्बल सहा लढती जिंकत केकेआर आता प्लेऑफच्या (IPL 2026 Playoffs) शर्यतीत आलाय.

KKR 2026 BEAT Mumbai

KKR 2026 BEAT Mumbai

IPL 2026: क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणाला सामना फिरला जातो. आता आयपीएल 2026 (IPL 2026) च्या सत्रात बघा ना. कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) सुरुवात अंत्यत खराब सुरुवात झाली. पहिल्या सहा सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स गमविले आहे. हा संघ आता आयपीएलमधून बाहेर पडणार अशी चर्चा सुरू झाली. या संघाच्या नेतृत्वावर टीका झाली. परंतु या संघाने जोरदार कॅमबॅक केले आहे. शेवटच्या सात सामन्यात तब्बल सहा लढती जिंकत केकेआर आता प्लेऑफच्या (IPL 2026 Playoffs) शर्यतीत आलाय. आता या संघाचे 13 सामन्यांमध्ये 13 पाँईट आहेत.


दिल्लीविरुद्ध शेवटची लढत

केकेआरचा लीग टप्प्यातील अखेरचा सामना 24 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स( Delhi Capitals) विरुद्ध होणार आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे केकेआरसाठी गरजेचे आहे. मात्र, फक्त विजय मिळवून चालणार नाही, तर इतर संघांच्या निकालांवरही कोलकात्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.


भाजपलाही फॉलोअर्समध्ये मागे टाकणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे एक्स अकाउंट बॅन; संस्थापक अभिजीत दिपके संतप्त


राजस्थानच्या पराभवाचीही गरज

केकेआरने दिल्लीवर विजय मिळवला, तर त्यानंतर मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करणे गरजेचे आहे. हे दोन्ही निकाल केकेआरच्या बाजूने लागल्यास 23 मे रोजी होणारा पंजाब किंग्स आणि लखनौ ( Lucknow Super Giants) यांच्यातील सामना महत्त्वाचा ठरेल. त्या सामन्यात एलएसजीने पंजाबचा पराभव केल्यास केकेआरचे प्लेऑफचे तिकीट निश्चित होऊ शकते.

मेडिकल प्रवेशासाठी लाखोंचे डीलिंग? शंभर टक्के सिलेक्शनची गॅरंटी देणाऱ्या मोटेगावकरच्या रॅकेटचा पर्दाफाश


मुंबईवर 4 विकेट्सने विजय

बुधवारी इडन गार्डनवर झालेल्या लढतीत केकेआरने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव केला. कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईचा डाव 20 षटकांत 8 बाद 147 धावांवर आटोपला. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने 18.5 षटकांत 6 विकेट्स गमावत विजय मिळवला. मनिष पांडेने 33 चेंडूत 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर रोवन पॉवेलने 30 चेंडूत 40 धावा जोडल्या. गोलंदाजीत सुनील नरेन याने चार ओव्हरमध्ये 13 धावा देत 1 बळी घेतला आहे. तसेर सौरभ दुबने आणि कार्तिक त्यागीने प्रत्येक दोन विकेट्स घेतल्या.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे 18 पाँइट आहेत. त्यामुळे हा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. गुजरात टायटन्सचे 16 पाँइट आहेत. तर हैदराबादचे 16 पाँइट आहेत. त्यामुळे हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.

Exit mobile version