IPL 2026 Auction : 125 कोटींपेक्षा जास्त कमाई अन् आयपीएलची पहिली महिला ऑक्शनर मल्लिका सागर कोण आहे?

IPL 2026 Auction :  संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या आयपीएल 2026 साठी आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

  • Written By: Published:
IPL 2026 Auction

IPL 2026 Auction :  संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या आयपीएल 2026 साठी आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. अबू धाबी येथे होणाऱ्या या लिलावासाठी हजार पेक्षा जास्त खेळाडूंनी अर्ज केला होता मात्र बीसीसीआयकडून 350 खेळाडूंची नावे फायनल करण्यात आली आहे. तर सोमवारी आणखी 19 खेळाडूंना या लिलावात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आज दहा संघ 369 खेळाडूंचे भवितव्य ठरवणार आहे. मात्र लिलाव हॉलमध्ये या खेळाडूंचा लिलाव करणारी महिला तुम्हाला माहिती आहे का?

बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आलेल्या माहितीनुसार, या 369 खेळाडूंसाठी बोली लावण्याची जबाबदारी मल्लिका सागरची (Mallika Sagar) असणार आहे. मल्लिकाने आयपीएल 2024 आणि आयपीएल 2025 च्या लिलावातही खेळाडूंसाठीऑक्शनर होती. तर आता पुन्हा एकदा ती आयपीएल 2026 साठी ही जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. मल्लिका सागर ही आयपीएलची (IPL 2026) पहिली महिला ऑक्शनर आहे. आयपीएलपूर्वी मल्लिकाने डब्ल्यूपीएल आणि प्रो कबड्डी लीगमध्येही ऑक्शनर म्हणून भूमिका बजावली आहे. या स्पर्धेत देखील ती पहिली महिला ऑक्शनर होती. वयाच्या 26 व्या वर्षी, ती न्यू यॉर्कमध्ये क्रिस्टीजसाठी लिलाव करणारी पहिली महिला होती. मुंबई आणि अमेरिकेत शिक्षण पूर्ण करणारी मल्लिका सागर एका व्यावसायिक कुटुंबातून आली आहे आणि तिला खेळांमध्ये खूप रस आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती ₹125 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, लिलाव हा तिच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. ती ब्रँड एंडोर्समेंटद्वारे देखील कमाई करते.

रुपया सर्वकालीन नीचांकी पातळीवर, एका डॉलरची किंमत 90.82 रुपये

आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात 77 जागा रिक्त आहेत, ज्यासाठी मल्लिका सागर खेळाडूंचा लिलाव करणार आहे. आज, 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या मिनी-लिलावासाठी, बीसीसीआयने यापूर्वी 240 भारतीय आणि 110 परदेशी खेळाडूंसह 350 खेळाडूंना अंतिम स्वरूप दिले होते. पण नवीन यादीत आता 253 भारतीय आणि 116 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.या मिनी-लिलावात जास्तीत जास्त 77 खेळाडू विकले जाऊ शकतात. यापैकी 31  जागा परदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. 40 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.

follow us