IPL 2026 Playoff Qualification Scenarios : आयपीएलच्या (IPL 2026) यंदाचा हंगाम आता रंगात आलाय. यंदा सपशेल अपयशी ठरलेला मुंबई आणि लखनौ संघ आयपीएलमधून बाहेर पडला. दिग्गज खेळाडू असलेल्या मुंबईला जबरदस्त कामगिरी करता आलेली नाही. 11 लढतीमध्ये मुंबईला (Mumbai Indians) आठ पराभव सहन करावे लागले आहेत. प्ले ऑफ शर्यतीसाठी कोणते चार संघ आघाडीवर आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे.
दिल्ली-कोलकाता बाहेर पडणार ?
आता दिल्ली कॅपिटल आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा प्रवास थांबविण्याच्या उंबरठ्यावर आहे. कारण दिल्लीची परिस्थिती सर्वाधिक कठीण झालीय. आतापर्यंत अकरा सामन्यात दिल्लीकडे फक्त सहा पाँईट आहेत आणि त्यांचा रनरेट वजामध्ये आहे. या प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना उरलेले सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तर इतर संघांचे पराभव व्हावे लागतील. ही जर तरची परिस्थिती आहे. परंतु हे गणित शक्य नाही. तर दुसरीकडे कोलकाताचे दहा लढतीमध्ये नऊ पाँइट आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी कोलकाताला चारही लढती जिंकाव्या लागतील. एखादा पराभवही कोलकाताला प्ले ऑफच्या बाहेर फेकेल.
मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार; ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे शानदार समारंभात अनावरण
टॉप-4 च्या शर्यतील कोण पुढे ?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 14 पाँइटसह टॉपवर आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी बंगळुरूला आणखी एका विजयाची गरज आहे. तर सनराइज हैदराबाद संघ 14 पाँइटसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जबरदस्त फलंदाजीमुळे ते टॉप 2 साठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. यंदाच्या सत्रात पंजाब किंग्स संघ डार्क हॉर्स ठरला आहे. तेरा पाँइटमुळे हा संघ पाँइट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. हा संघ अजूनही चार सामने खेळणार असून, त्यातील दोन सामने जिंकल्यानंतर या संघाचे 17 पाँईट होतील. या संघाचा फॉर्म पाहता पंजाबला हे अवघड नाही. 14 पाँइटसह गुजरात टायटन्स संघ शर्यतीत आहे. मात्र या संघाचा नेट रनरेट आरसीबी आणि हैदराबादपेक्षा कमी आहे.
‘कोणी डॉक्टर तर कोणी अभिनेता’; मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळात या चेहऱ्यांचा समावेश
चेन्नई आणि राजस्थानसाठी करो या मरो
चौथ्या क्रमांकासाठी खरी लढत चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये असणार आहे. कारण दोन्ही संघांकडे समसमान 12 पाँइट आहेत. राजस्थानची या स्पर्धेत जबरदस्त सुरुवात झाली होती. पण सलग तीन पराभवामुळे राजस्थान संघ बॅकफूटला गेलाय. तर चेन्नईला उर्वरीत तीन लढतीपैकी दोन लढती जिंकाव्या लागणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघापैकी कुणाची प्ले ऑफसाठी लॉटरी लागेल हे नेट रनरेटवर ठरण्याची शक्यता आहे.
