Download App

पाकिस्तानचे कंबरडे मोडले अन् बुमराहची टॉप गोलंदाजांच्या लिस्टमध्ये धडक

World Cup 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत-पाक सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचे भेदक गोलंदाजीने कंबरडे मोडले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात महत्वाचे दोन 2 बळी घेतले. अशा प्रकारे जसप्रीत बुमराह विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. आत्तापर्यंत बुमराहने वर्ल्ड कपमध्ये 26 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा बुमराह सहावा गोलंदाज ठरला आहे.

जसप्रीत बुमराह प्रथमच 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळला होता. त्याचबरोबर भारतासाठी विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जवागल श्रीनाथ आणि झहीर खान पहिल्या क्रमांकावर आहेत.

टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट
जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांनी वर्ल्ड कपमध्ये भारताकडून 44-44 विकेट घेतल्या होत्या. या यादीत भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे तिसऱ्या स्थानावर आहे. अनिल कुंबळेच्या नावावर विश्वचषक सामन्यांमध्ये 31 विकेट आहेत. याशिवाय मोहम्मद शमीने विश्वचषक सामन्यांमध्ये 31 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताचा माजी कर्णधार कपिल देवच्या नावावर 28 विकेट आहेत. तर जसप्रीत बुमराहने 26 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह नंतर मनोज प्रभाकर आहे. मनोज प्रभाकरने विश्वचषकात 24 विकेट घेतल्या आहेत.

World Cup 2023 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रोहित शर्मा, श्रेयस अय्यरची धुव्वाधार खेळी

भारताचा पाकिस्तानवर सलग आठवा विजय
जर आपण भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल पाहिले तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर ऑलाआउट झाला. अशा प्रकारे भारतीय संघासमोर 192 धावांचे लक्ष्य होते. जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना भारताकडून प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

रोहित शर्माने षटकारांचा इतिहास रचला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकारांचा मानकरी

रोहित शर्माच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारताने पाकिस्तानचा 117 चेंडूंत 7 विकेट राखून पराभव केला. हिटमॅनने अवघ्या 63 चेंडूत 86 धावांची शानदार खेळी केली. तर श्रेयस अय्यर 62 चेंडूत 53 धावा काढून नाबाद राहिला.

Tags

follow us