Download App

Kane Williamson : भारताला पराभूत करणाऱ्या कर्णधारानेच दिलं WTCच्या अंतिम सामन्यात स्थान

New Zealand VS Shrilanka :  भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेच्या संघाला हरवल्याने भारतीय संघ हा फायनलमध्ये पोहोचला आहे. त्याउलट भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्याचा शेवटचा दिवस होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या संघाला ऑलआऊट करण्याचा जोरदार प्रयत्न करत होता. पण न्यझीलंडच्या संघाने रोमहर्षक विजय मिळवल्याने भारताचे WTC फायनलचे तिकीट पक्के झाले आहे.

याधी पहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला हरवले होते. 18 जून ते 23 जून 2021 रोजी साउथॅम्पटन येथे हा सामना खेळवला गेला होता. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली होता तर न्यझीलंडचा कर्णधार हा केन विल्यमसन होता. तेव्हा न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. पण आज न्यूझीलंडने सामना जिंकल्याने भारताला फायनल गाठणे सोपे झाले आहे.

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा नवा विक्रम

दरम्यान आज न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीचा शेवटचा दिवस होता. सामन्याचा शेवटच्या दिवशी श्रीलंकेच्या स्थिती हे भक्कम दिसत होती. सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 285 धावांची आवशक्यता होती. शेवटच्या दिवशी हे आव्हान पूर्ण करणे जवळपास अशक्य होते. परंतु केन विल्यमसनने आपल्या शतकी खेळीने न्यूझीलंडच्या संघाला विजय मिळवून दिला. त्याला न्यूझीलंडच्या डिरेल मिचेल या बॅट्समॅनची मदत झाली.

https://twitter.com/sparknzsport/status/1635173092434780161?s=20

हा सामना अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत चालला होता. शेवटच्या  तीन ओव्हरमध्ये भारताला 20 धावांची आवशक्यता होती. त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 7 धावा पाहिजे होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक केन विल्यमसनकडे होती. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर विल्यमसनसने चौका मारला. त्यानंतर सामना टाय झाला. पाचवा बॉल डॉट गेला. त्यानंतर शेवटच्या बॉलवर विल्यमसनने डाय मारुन 1 धाव पूर्ण केली. त्यामुळे न्यूझीलंडने श्रीलंकेचा 2 विकेटने पराभव केला. यानंतर भारताचा WTC फायनल स्पर्धेचा रस्ता मोकळा झाला आहे. भारताची ऑस्ट्रेलिया संघासोबत फायनल सामना होणार आहे.

IND vs AUS 4th Test: अहमदाबाद कसोटी अनिर्णित: भारताने सलग चौथी मालिका जिंकली, अशी कामगिरी करणारा पहिला संघ ठरला

Tags

follow us