Download App

Khel Ratna Award 2024 : मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रविण कुमारला भारताचा सर्वोच्च ‘खेलरत्न’ पुरस्कार…

मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रविण कुमारला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

Khel Ratna Award 2024 : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार (Khel Ratna Award 2024) 2024 ची घोषणा केलीयं. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरसह बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरॉलिम्पिक खेळाडू प्रविण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 17 जानेवारी रोजी या खेळाडूंना राष्ट्रपती भवनामध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखाली भारताने कांस्यपदक जिंकल. त्यासाठी सिंग यांच्या नावाची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. तर पॅरिस पॅरॉलिम्पिक स्पर्धेत उंच उडजी T64 गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रविण कुमारचंही नाव या पुरस्कारासाठी देण्यात आलं होतं. या पुरस्काराच्या यादीत नेमबाज मनू भाकरचं नाव नसल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.

भारतीय महिलांकडे जगात कुणाकडेच नाही इतकं सोनं; जाणून घ्या, कोणत्या देशात किती साठा?

मनूने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला दोन कांस्टपदकं जिंकून दिली होती आणि तिचे नाव नसल्याने तिच्या वडिलांनी संताप व्यक्त केला होता. मनूनेही तिचे मत मांडले होते. सर्वात प्रतिष्ठित खेल रत्न पुरस्कारासाठी माझ्या नामांकनावरून चालू असलेल्या वादासंदर्भात मी हे सांगू इच्छितो की, एक खेळाडू म्हणून माझी भूमिका माझ्या देशासाठी खेळणे आणि सर्वोत्तम कामगिरी करणे आहे. पुरस्कार आणि सन्मान हे मला प्रेरित ठेवतात पण ते माझे अंतिम ध्येय नसल्याचं मनू भाकरने सांगितलं होतं.

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही रामासुब्रमणियम यांच्या अध्यक्षतेखालील 12 सदस्यीय निवड समितीने ही नावं सुचवली होती. दरम्यान, 18 वर्षीय भारतीय बुद्धिबळवीर डी गुकेशने नुकताच सिंगापूरमध्ये विद्यमान चॅम्पियन डिंग लिरेनला हरवून जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते . या विजयाबरोबर तो इतिहासातील सर्वात तरुण जागतिक चॅम्पियन बनला आहे. गुकेशने वयाच्या 11 व्या वर्षी बोलून दाखवलेला निर्धार आज पूर्ण केला आणि तो 18 वर्ष, 8 महिने, 14 दिवसांचा असताना वर्ल्ड चॅम्पियन ठरला. त्याने गॅरी कास्परोव्ह यांनी 1985 मध्ये 22 वर्ष, 6 महिने, 27 दिवसांचा असताना नोंदवलेला विक्रम मोडला. त्यालाही या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

follow us