LSG Vs RR : आयपीएल मालिकेत केएल राहुलच्या कर्णधारपदाची अग्निपरीक्षा सुरु आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सनं बुधवारी रात्री राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना १० धावांनी जिंकला आहे. मात्र, या विजयात एलएसजीचा कर्णधार केएल राहुलच्या फलंदाजीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. केएल राहुलच्या संथ फलंदाजीवर सध्या जोरदार टीका होत आहे.
केएल राहुल याची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी याला कारणीभूत असल्याची चर्चा सुरु आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यामध्ये राहुलला फलंदाजीमध्ये दोन वेळेस जीवदान मिळाले आहे, पण त्याला याचा फायदा घेता आला नसल्याचे दिसून येत आहे. प्रथम फलंदाजी लखनऊ सुपर जायंट्सच्या डावाची सुरुवात कर्णधार केएल राहुलने काइल मेयर्स बरोबर सुरु केली होती.
राहुल सामन्यात पहिल्या चेंडूवर स्ट्राइकला होता आणि त्यावेळेस ट्रेंट बोल्ट गोलंदाजी करत होता. बोल्डने टिच्चून मारा करत राहुलला एक देखील धाव काढू दिले नसळायचे दिसून आले आहे. या सामन्याचे पहिले षटक वाया गेले आहे. यामुळे केएल राहुलच्या नावावर एका लाजिरवाणा विक्रमाची भर पडली आहे. आयपीएलमध्ये २०१४ पासून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकूण आतापर्यंत २७ षटके टाकण्यात आली आहेत, त्यापैकी फक्त केएल राहुलने ११ षटके खेळले आहेत.
या षटकांमध्ये राहुलने एकही धाव काढली नाही. टी-२० क्रिकेटमधील हा विक्रम कोणत्याही फलंदाजाला लाजवणार असा आहे. यामुळे काल केविन पीटरसन यांनी देखील लाइव्ह कॉमेंट्रीमध्ये राहुल याच्या फलंदाजीवर जोरदार टीका केल्याचे दिसत आहे. पॉवरप्लेमध्ये केएल राहुलची फलंदाजी पाहणं हे सर्वांसाठी कंटाळवाणा वाटत आहे, असं यावेळी म्हणाला आहे. त्याच्या या टीकेवर सध्या जोरदार चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.
Sanjay Shirsat : केवळ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची बदनामी करणं हा राऊतांचा उद्देश
आयपीएलच्या २६ व्या सामन्यामध्ये पहिली ओव्हर टाकून बोल्टने खेळाचे पहिले षटक निर्धाव टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये भुवनेश्वर कुमारबरोबरच अव्वल स्थान पटकावले आहे. आयपीएलमध्ये बोल्ट आतापर्यंत प्रत्येकी ८ ओव्हर निर्धाव टाकले आहे. या सीझनमध्ये बोल्टची पहिल्या षटकात कामगिरी अतिशय उत्कृष्ट ठरणार आहे. आतापर्यंत त्याने ५ षटकात २.६ च्या इकॉनॉमीसोबतच १३ धावा दिले आहेत.