IND vs AFG T20I Series : अफगाणिस्तान विरुद्ध तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (IND vs AFG T20I Series) घोषणा झाली आहे. बऱ्याच काळानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची टी 20 क्रिकेटमध्ये वापसी झाली आहे. दुसरीकडे मात्र असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांची निवड झालेली नाही. निवडकर्त्यांनी या खेळाडूंकडे दुर्लक्ष करत सरळ त्यांच्या टी 20 क्रिकेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने बोलले जात आहे. त्यामुळे आता आगामी टी 20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) या पाच खेळाडूंचे भवितव्य संकटात सापडले आहे.
युजवेंद्र चहल
भारतीय संघासाठी टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणजे युजवेंद्र चहल. आगामी अफगाणिस्तान मालिकेसाठी मात्र चहलकडे (Yujvendra Chahal) दुर्लक्ष करण्यात आले. मागील टी 20 विश्वचषकानंतर चहल टी 20 क्रिकेटमध्ये पुन्हा दिसलेला नाही. याच कारणामुळे आगामी टी 20 विश्वचषकात त्याची निवड होणे खूप कठीण झाले आहे.
IND vs AFG T20 : टी 20 मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक!
भुवनेश्वर कुमार
2022 मध्ये भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळणारा भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसा दिसत नाही. भुवनेश्वरने याआधी टी 20 सामना नोव्हेंबर 2022 मध्ये खेळला होता. आता मात्र बऱ्याच काळापासून तो क्रिकेटपासून तो दूर आहे. त्यातच संघात आता अर्शदीप सिंह, आवेश खान आणि मुकेश कुमार या गोलंदाजांची एन्ट्री झाली आहे त्यामुळे टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भुवनेश्वर कुमारला संधी मिळणे खूप कठीण आहे.
केएल राहुल
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शानदार प्रदर्शन करून भारतात परतलेल्या के एल राहुल (KL Rahul) याला आगामी टी 20 मालिकेतून वगळले आहे. राहुलने मागील जवळपास दीड वर्षांपासून एकही टी 20 सामना खेळलेला नाही. अफगाणिस्तान मालिकेतून राहुलला वगळले म्हणजे आगामी टी 20 विश्वचषकातही त्याचा विचार होणार नाही असे संकेत मिळत आहेत.
IND vs AFG: टी-20 मालिकेसाठी रोहित, कोहलीचे संघात ‘कमबॅक’ गोलंदाजीमध्ये मोठे बदल
श्रेयस अय्यर
ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) संघात होता. मात्र अफगाणिस्तान मालिकेत (Afghanistan) त्याला संधी मिळाली नाही. मिडल ऑर्डरमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) यांची वापसी झाल्यानंतर अय्यरला संघात स्थान मिळवणे कठीण होत आहे.
ईशान किशन
अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी ईशान किशनची निवड न झाल्याने सगळेच आश्चर्यचकित झाले. संजू सॅमसन (Sanju Samson) आणि जितेश शर्मा यांना प्राधान्य देण्यात आले. जर या मालिकेत संजू सॅमसन यशस्वी ठरला तर आगामी टी 20 विश्वचषकात ईशान किशनसाठी वाट आधिक कठीण होईल हे मात्र नक्की.