Download App

Team India Holi Celebration : ‘रंग बरसे’ गाण्यावर कोहली, रोहितचा ढासू डान्स; अशी साजरी केली धूळवड

  • Written By: Last Updated:

सध्या सगळीकडे होळीचा (Holi) आणि धुळवडीचा उत्साह आहे. हे सण देशातील सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे सण मानले जातात. या दिवशी सर्वत्र रंगांची उधळण होते. देशातील विविध भागांत होळी आणि धुळवड मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत आहे. अनेक सेलिब्रिटीही जल्लोषात होळी साजरी करताना दिसत आहेत. रंगांची उधळण करत देशभरात आज रंगाचा सण साजरा करण्यात आला. टीम इंडियानेही आज धुळवड साजरी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित शर्मा, (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli), शुभमन गिल (Shubman Gill) यांच्यासह टीम इंडियातील सगळे खेळाडू रंगांची उधळण करताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघातील हे सगळे खेळाडू रंग बरसे या गाण्याच्या तालावर डान्स करतांना दिसत आहेत.

सध्या संपूर्ण देशात होळी आणि धुळवडीचा उत्साव सुरू आहे. त्यामुळे सगळेजण उत्साहात आहेत. भारतीय क्रिकेट संघानेही वेळ काढून रंगाचा हा उत्सव साजरा केा. सध्या भारतीय क्रिकेट संघ होळीच्या मुहूर्तावर अहमदाबाद कसोटीच्या तयारीत व्यस्त आहे. इंदूरमधल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना अहमदाबाद कसोटी जिंकून मालिका जिंकण्याची इच्छा आहे. त्यामुळे संपूर्ण संघ पुढच्या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, संघातील खेळाडूंनी बसमध्येच होळीचा आनंदा साजरा केला. भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने होळीच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की, विराट कोहली हा सर्वात पुढे असून तो होळी साजरी करताना दिसत आहे. कम डाऊन आणि रंग बरसे या गाण्यांवर विराट नाचतांना या व्हिडिओत दिसत आहे. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर मागून गुलाल उधळत आहे. श्रेयस अय्यरसह संघातील सर्व खेळाडू रंगीबेरंगी गुलालाने रंगले आहेत. टीमचे सपोर्ट स्टाफही उत्साहात होळी साजरी करत आहेत.

Ahmednagar : राम शिंदेंच्या ट्विटमुळे राजकारण तापले, फडणवीसांच्या साक्षीने राष्ट्रवादीला धक्का ? 

ईशान किशन देखील भारतीय संघाची होळी साजरी करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिओत सर्व खेळाडू जल्लोष करत होळीच्या शुभेच्छा देत आहेत. या व्हिडिओमध्येही सर्व खेळाडू कलरफुल दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत ईशानने लिहिले की, भारतीय संघाकडून सर्वांना होळीच्या शुभेच्छा. यावेळी क्रिकेट चाहत्यांनीही त्यांनी धुळवडीच्या शुभेच्छा दिल्यात.

 

 

 

 

Tags

follow us