LSG vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघ आमनेसामने आहेत. लखनौमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संघाने 9 गडी गमावून 126 धावा केल्या.
लखनऊसमोर आता सामना जिंकण्यासाठी 127 धावांचे लक्ष्य आहे. बंगळुरूकडून कर्णधार डू प्लेसिसने 40 चेंडूत सर्वाधिक 44 धावा केल्या. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 31 धावांची खेळी खेळली. तर दिनेश कार्तिकने 16 धावा केल्या.लखनऊकडून नवीन उल हकने 3 बळी घेतले. तर अमित मिश्रा आणि रवी बिश्नोई यांनी 2-2 विकेट घेतल्या.
तिसऱ्या षटकात लखनऊचा कर्णधार केएल राहुल जखमी झाल्याने मैदानाबाहेर गेला. पावसामुळे सामना 16व्या षटकात थांबवण्यात आला होता, मात्र सामना पुन्हा सुरू झाला आहे.
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाचा या मोसमात बेंगळुरूविरुद्धचा हा दुसरा सामना आहे. पहिला सामना 10 एप्रिल रोजी झाला, ज्यामध्ये लखनऊसंघ 1 विकेटने जिंकला.
मी काय शिलाजीतची भाकरी खातो का? लैंगिक शोषणाच्या आरोपावर ब्रिजभूषण भडकले
लखनऊने हा सामना जिंकल्यास गुणतालिकेत अव्वल
सध्या लखनऊचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, बेंगळुरू संघाने आतापर्यंत 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत हा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. हा सामना आरसीबीने जिंकल्यास पाचव्या क्रमांकावर पोहोचेल. लखनौचा संघ हा सामना जिंकत असताना, गुजरात टायटन्सला सोडचिठ्ठी देऊन अव्वल स्थानावर पोहोचेल.