Cricket News : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत बंगळुरू संघाने विजय (Cricket News) मिळवला होता. आयपीएलच्या इतिहासात बंगळुरूचा संघ प्रथमच विजेता बनला होता. त्यामुळे यशाचा हा आनंद साजरा करण्यासाठी एक व्हिक्ट्री परेड काढण्यात आली होती. या परेड दरम्यान चेंगराचेंगरी होऊन 11 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी करण्यासाठी जस्टी जॉन मायकल डी कुन्हा यांच्या अध्यक्षतेत एक आयोग गठीत करण्यात आला होता. या न्यायिक आयोगाचा अहवालला कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरीही दिली होती. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार या अहवालात काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
या अहवालात चिन्नास्वामी स्टेडियम सुरक्षित नाही असे नमूद करण्यात आले आहे. स्टेडियमची सध्याची रचना मोठ्या आयोजनांसाठी उपयुक्त नाही तसेच धोकादायक आहे. स्टेडियममध्ये पुरेशा प्रमाणात एन्ट्री आणि एक्झिट पॉइंट नाही. इतकेच नाह तर स्टेडियममध्ये जागतिक दर्जाचा कोणताही आपत्कालीन प्लॅन नाही जेणेकरुन संकटाच्या काळात स्टेडियममधून बाहेर पडता येईल. स्टेडियमच्या आजूबाजूचे रस्ते अतिशय व्यस्त आहेत. वाहनांच्या पार्किंगसाठीही पुरेशी जागा नाही असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भिडणार! शेड्यूल जारी, वाचा कधी अन् कुठे होणार सामने
याच वर्षात महिला क्रिकेट वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेतील चार सामने याच मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेतील फायनल सामन्यात जर पाकिस्तानचा संघ पोहोचला नाही तर हा अंतिम सामना देखील याच मैदानात होईल. याचबरोबर पुढील वर्षा होणाऱ्या IPL आणि WPL स्पर्धांतील सामने देखील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहेत. परंतु, हा अहवाल समोर आल्यानंतर वर्ल्डकप आणि अन्य क्रिकेट स्पर्धांचे सामने या मैदानात होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्नाटक सरकारने या अहवालाला मंजुरी दिली आहे. यामुळे RCB, KSCA (कर्नाटक क्रिकेट संघ), DNA एंटरटेनमेंट आणि बंगळुरू पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. रिपोर्टनुसार व्हिक्ट्री परेड दरम्यान फक्त 79 पोलिस मैदानात उपस्थित होते. बाहेरच्या परिसरात कुणीही नव्हतं. रुग्णवाहिकाही नव्हत्या. इतकेच नाही तर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाने या ठिकाणी आले होते. आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके पूर्ण करणाऱ्या स्टेडियमवरच मोठे कार्यक्रम आयोजित करावेत अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
जो रुट चमकला…, झळकावले कारकिर्दीतील 38 वे शतक अन् मोडले अनेक विक्रम