Mahavir Phogat On Wrestlers Protest : भारतीय कुस्तीपटू आणि भाजप खासदार तसेच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यामधील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यातच कुस्तीपटुंकडुन होणाऱ्या आरोपावर आता खुद्द ब्रिजभूषण यांनी आक्रमक होत उत्तर दिले आहे. तसेच कुस्तीपटू देखील यांनी देखील कारवाईची मागणी करत आंदोलन पुकारले आहे. यामुळे हा वाद काही लवकर मिटेल अशी शक्यता दिसत नाही आहे.
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एका अल्पवयीनासह सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता यामध्ये माजी पहिलवान फोगाट बहिणींचे वडिल महावीर फोगाट यांनी देखील उडी मारली आहे.
महावीर फोगाट म्हणाले आहेत की, ही करो या मरोची स्थिती आहे. पण न्याय मिळेपर्यंत आम्ही उपोषण करू. बबिता फोगाटही या लढाईत आहे. जानेवारीत उपोषण झालं. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी कऱण्यासाठई समिती नेमण्यात आली पण न्याय मिळाला नाही. गुन्हा दाखल झाला नाही.
Wrestlers Protest : ब्रिजभूषण सिंह परखड टीका, कुस्तीपटूंच्या आंदोलनाची केली शाहीनबागशी तुलना
2014 पासून आम्हाला या प्रकरणीची कल्पना होत पण माझ्या तीन मुली राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धांमध्ये खेळत होत्या. याविरोधात आवाज उठवला असता तर त्यांच्यावर कारवाई झाली असती. त्यांना स्पर्धेत भाग घेता आला नसता. मात्र यामुळे आमच्यावर आरोप कऱण्यात आले की, आमच्या कुटुंबाला डब्ल्यूएफआयमध्ये पड हवं आहे. म्हणून आम्ही हे करत आहोत. मात्र तसं नाहीय आम्ही या उपोषणाला समर्थन करत आहोत.
दरम्यान यावेळी त्यांना आमिर खानच्या उपोषणाला पठिंब्याविषयी विचारले असता. ते म्हणाले, अभिनेत्यांकडून जास्त आपेक्षा नाही. पण आमीर खानने जर उपोषणाला समर्थन करणारं ट्वीट केलं तर आम्हाला आनंद होईल. या उपोषणाला कोणाचा पाठिंबा मिलत नाहीय. खेळाडूंच नुकसान झालं आहे. त्यांचा सराव, आहार यावर परिणाम होत आहे.