Wrestlers Protest : ब्रिजभूषण सिंह परखड टीका, कुस्तीपटूंच्या आंदोलनाची केली शाहीनबागशी तुलना
Brijbhushan Sign On Wrestlers Protest : भारतीय कुस्तीपटू आणि भाजप खासदार तसेच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यामधील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यातच कुस्तीपटुंकडुन होणाऱ्या आरोपावर आता खुद्द ब्रिजभूषण यांनी आक्रमक होत उत्तर दिले आहे. तसेच कुस्तीपटू देखील यांनी देखील कारवाईची मागणी करत आंदोलन पुकारले आहे. यामुळे हा वाद काही लवकर मिटेल अशी शक्यता दिसत नाही आहे.
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एका अल्पवयीनासह सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता यावर ब्रिजभूषण यांनी टीका केली आहे की, ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाची तुलना शाहीनबाग मध्ये झालेल्या आंदोलनाशी केली आहे.
#WATCH | If my party asks me to resign, I will resign…Forces involved in 'Tukde Tukde gang', Shaheen Bagh, 'Kisaan Andolan' seem to be involved in it (Wrestlers' protest), I am not their target, party (BJP ) is their target, these athletes are paid. Protest is expanding like… pic.twitter.com/AUzVGnk39V
— ANI (@ANI) May 1, 2023
तसेच ब्रिजभूषण म्हणाले की, मला पक्षाने सांगितलं तर मी राजीनामा देईल. पण कुस्तीपटूंच्या आंदोलनामागे असलेल्या फौजांचा निशाणा मी नाही तर भाजप पक्ष आहे. शाहीनबाग आणि शेतकरी आंदोलनामागेही यात फौजा होत्या असं ते म्हणाले. यामागे उद्योगपती आहेत. त्यांनी या खेळाडूंना आंदोलनासाठी पैसे दिले आहेत. अशी परखड टीका भारतीय कुस्तीपटू आणि भाजप खासदार तसेच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांनी केली आहे.
Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी अरविंद केजरीवाल जंतर-मंतरवर, म्हणाले…