Viral Video : नेमबाज मनू भाकरची (Manu Bhaker) आई सुमेधा भाकर आणि नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यंदा ऑलिम्पिकचे यजमानपद असलेल्या पॅरिसमध्ये या दोघांची भेट झाली. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘शरद पवारांचा राज ठाकरेंवर जोरदार पलटवार’; म्हणाले, मी या रस्त्याने कधी जात नाही, मला महाराष्ट्र…
Manu Bhaker’s Mother with Neeraj Chopra. pic.twitter.com/SDWbaWeOG7
— Avinash Aryan (@avinasharyan09) August 11, 2024
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकली होती. मनूने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पहिले पदक जिंकले. यानंतर 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसोबत कांस्यपदक जिंकले. यासह मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. दुसरीकडे, नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत रौप्य पदक जिंकले. आता पॅरिस ऑलिम्पिक संपले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांच्या आई सुमेधा भाकरचा आहे.
Vedaa : ‘वेदा’ची थक्क करणारी ॲडव्हान्स बुकिंग; पहिल्याच दिवशी मोडणार कमाईचे सर्व विक्रम?
या व्हायरल व्हिडिओमध्ये मनू भाकरची आई नीरज चोप्रासोबत काहीतरी बोलताना दिसत आहे. यादरम्यान ती नीरजचा हात आपल्या डोक्यावर हात ठेवते. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे कळू शकलेलं नाही. त्यामुळे नेटकऱ्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहे. एका युजरने लिहिले की, रिलेशनशिप कन्फर्म झालं… तर दुसऱ्या युजरने लिहिले, सिधा रिश्ता कर दिया क्या इसका…. तर आणखी एका युजरनेही अशाच विनोदी पद्धतीने लिहिले, बेटा, किती हुंडा घेणार?
पॅरिस गेम्सच्या समारोप समारंभात मनू भाकरने भारताचे प्रतिनिधित्व केले. तिच्यासोबत नीरज चोप्रा येणार होता. पण भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनसह ऍथलीटने नीरज चोप्रा ऐवजी पीआर श्रीजेशला हा मान दिला.