Paris Olympic : कांस्यपदकांनंतर मनु भाकरची 25 मीटर एअर पिस्टलमध्ये घौडदौड सुरु…

Paris Olympic : कांस्यपदकांनंतर मनु भाकरची 25 मीटर एअर पिस्टलमध्ये घौडदौड सुरु…

Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympic) आजच्या सातव्या दिवशी नेमबाज मनु भाकर 25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेच्या पात्रतेत उतरलीयं. या पात्रता स्पर्धेत मनु पात्र ठरली तर आणखी पदके गळ्यात पाडून घेण्याची शक्यता आहे. महिलांच्या २५ मीटर एअर पिस्टल पात्रता स्पर्धा मनू भाकरसाठी आव्हानात्मक आहे. मनुचा पात्रता सामना सुरु झाला असून अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. भारताची आणखी एक नेमबाज ईशा सिंगही या स्पर्धेत उतरलीयं.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांनी कांस्यपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंनी लक्ष्याचा वेध घेत कास्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेतील मनू भाकरचे हे दुसरे पदक ठरले. एकाच स्पर्धेत दोन पदके मिळवणारी ती पहिलीच खेळाडू ठरलीयं.

“ज्याचा आमदार त्याचीच जागा”; निवडणुकीसाठी अजितदादांचा अजेंडा क्लिअर

मनू ऑलिम्पिकच्या इतिहासात दोन मेडल जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूने अशी कामगिरी केलेली नाही. सुशील कुमा आणि पीव्ही सिंधू यांनी अशी कामगिरी केली आहे पण हे मेडल एकाच ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले नाहीत.

Assembly Election 2024 : काँग्रेसची दिल्लीमधून ‘फिल्डिंग’; मधुसुदन मिस्त्री प्रमुख असलेली महत्त्वाची कमिटी

दरम्यान,10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत मनू भाकर आणि सरबज्योत सिंह जोडीला पहिल्या सिरीजमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. 2-0 अशा पिछाडीवर पडल्यावर पुढील चार सिरीज मात्र जिंकल्या. यामुळे 8-2 असा स्कोअर झाला. यानंतर पुन्हा एक सिरीज भारताने आणि एक सिरीज कोरियाने जिंकली. त्यानंतर 10-4 असा स्कोअर झाला होता. यानंतर कोरियाने पुन्हा एक सिरीज जिंकली आणि स्कोअर 10-6 असा झाला. पुढील दोन स सिरीज मात्र भारताने जिंकल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube