Vinesh Phogat Verdict : विनेशच्या याचिकेवरील निर्णयाची तारीख पुन्हा बदलली…
Vinesh Phogat Verdict : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) महिला कुस्ती अंतिम स्पर्धेआधी वजन अधिक भरल्याने विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर विनेशला संयुक्त रौप्यपदकासाठी क्रीडा लवादाकडे दाद मागण्यात आली. मात्र, सीएएस लवादांकडून तारीख पे तारीख (Vinesh Phogat Verdict) देण्यात येत आहे. विनेश फोगटच्या याचिकेवर आता येत्या 16 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, पैसे परत घेणार नाही; राणांच्या विधानावर अजितदादांकडून सारवासारव
ऑलिम्पिक खेळांसाठी सीएएस लवाद नियमांच्या कलम 18 च्या अर्जाद्वारे सीएएस विभागाचे अध्यक्ष पॅनेलला निर्णय देण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत मुदवाढ देण्यात येत असल्याचं सीएएसकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता विनेश फोगटच्या याचिकेवर 16 ऑगस्टला भारतीय वेळेनूसार 9 : 30 वाजता होणार आहे.
Government Schemes : डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजनेचा कोणाला अन् कसा फायदा मिळणार?
याआधी विनेश फोगटच्या याचिकेवर क्रीडा लवादाच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. यानंतर आता या प्रकरणाचा निर्णय 13 ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी दिला जाणार असल्याची माहिती क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडून देण्यात आली. माहितीनुसार, या प्रकरणाचा निर्णय 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता येणार होता. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी संपली असून आता 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता निर्णय येणार असल्याचं सांगण्यात आलं.
इतना सन्नाटा क्यूं है भाई? रिलायन्स कर्मचारी कपातीवर अनुपम मित्तल यांनी काय सांगितलं..
आता पुन्हा एकदा तारीख वाढवण्यात आली असून येत्या 16 ऑगस्टला सुनावणी पार पडणार आहे. तर दुसरीकडे पॅरिस ऑलिम्पिक संपण्यापूर्वी या प्रकरणी निर्णय घेतला जाईल अशी माहिती यापूर्वी सीएएसने दिली होती मात्र न्यायालयाने या प्रकरणात दोन्ही बाजूंना अतिरिक्त पुरावे सादर करण्यासाठी 11 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. सामान्यत: तदर्थ पॅनेलला निर्णय देण्यासाठी 24 तास दिले जातात. मात्र या प्रकरणात पॅनलने दुसऱ्यांदा मुदतवाढ मागितलीयं.