सुवर्णपदकाची चाहूल! नीरज चोप्राची सर्वोत्तम कामगिरी; भालाफेकच्या अंतिम फेरीत दाखल…

सुवर्णपदकाची चाहूल! नीरज चोप्राची सर्वोत्तम कामगिरी; भालाफेकच्या अंतिम फेरीत दाखल…

Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) स्पर्धेत भालाफेकपट्टू नीरज चोप्राने (Neeraj chopra) आज सर्वोत्तम कामगिरी केलीयं. ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत जबरदस्त भाला फेकून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. पात्रता स्पर्धेत ब गटात आघाडीत असलेल्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भाला फेकलायं. त्यामुळे पुरुष भालाफेक स्पर्धेत भारताचा गोल्डन बॉय नीरज फेरीत दाखल झाला आहे. आता अंतिम फेरीत नीरज सुवर्णपदकाला गवसणी घालण्याची शक्यता आहे.

Bigg Boss Marathi: बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण पडलाय परदेसी गर्ल इरिनाच्या प्रेमात?

तर दुसरीकडे पाकिस्तानचा अर्शद नदीमही आपल्या पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरलायं. त्याने 86.59 मीटर भाला फेकला असून ऑलिम्पिक स्पर्धेतील नदीमचा सर्वोत्तम थ्रो आहे. आता अंतिम फेरीत त्याचा सामना भारताच्या नीरजशी होणार आहे. नीरज चोप्राचा सहकारी किशोर जेना ग्रुप-ए मध्ये होता. त्याने 80.73 मीटर फेक केली आणि तो त्याच्या गटात 9 व्या स्थानावर राहिला. तो अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. नीरज चोप्रा पहिल्या फेरीत अव्वल ठरला.

BB Marathi : आज सुटणार ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’; कोण होणार बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन?

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी स्पर्धकाला किमाल 84 मीटर भाला फेकणे आवश्यक असतं. यामध्ये प्रत्येक खेळाडूला अंतिम फेरीत जाण्यासाठी ३ संधी मिळतात. जर कोणी पहिल्या फेरीत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर त्याला उर्वरित दोन थ्रोची गरज नसते. नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांनी पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केल्याने त्यांनी उर्वरित प्रयत्नांमध्ये भाग घेतला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube