अवघ्या एक रूपयात पाकिस्तानची बोलती बंद करणारे हरिश साळवे विनेश फोगटसाठी मैदानात

विनेश फोगटच्या अपात्रतेविरोधातील याचिकेवर आज (दि.9) सुनावणी होणार आहे.

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 08 09T123754.208

Harish Salve Represent IOA In Vinesh Phogat Disqualification Case : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र केलेल्या भारतीय कुस्तीपटूसाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे (Harish Salve) अखेर मैदानात उतरले आहेत. विनेश फोगटच्या (Vinesh Phogat) अपात्रतेविरोधातील याचिकेवर आज (दि.9) सुनावणी होणार असून, ज्येष्ठ वकील हरीश साळवे विनेश फोगटची बाजू मांडणार आहेत.

Vinesh Phogat: नखं कापली केस कापली अन् रक्तसुद्धा काढलं; मात्र, वजन प्रकारात विनेशची हार

हरीश साळवे हे तेच वकील आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या वतीने कुलभूषण जाधव यांचा खटला लढवला होता. त्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले. कुलभूषण यांची केस लढताना साळवे यांनी फी फक्त एक रुपया घेतला होता. आता तेच साळवे कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) मध्ये विनेश फोगटसाठी बाजू मांडणार आहे.

 

 

क्रीडा लवादाच्या न्यायालयात आज दुपारी 1 वाजता विनेश फोगट अपात्र प्रकरणावर सुनावणी होणार असून, देशातील आघाडीच्या वकिलांमध्ये हरीश साळवे यांची ओळख आहे. त्यामुळे विनेशच्या प्रकरणात साळवे यांचा युक्तीवाद पदक मिळवून देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.

कुलभूषण प्रकरणात आकरली होती फक्त 1 रुपया फी 

हरीश साळवे यांची देशात प्रसिद्ध आणि यशस्वी वकील म्हणून ओळख आहे. 1999 ते 2002 दरम्यान त्यांनी भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केले आहे. महागड्या वकिलांमध्ये साळवे यांची गणना होते. मात्र, काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या खटल्यात त्यांनी केवळ एक रुपया एवढी फीस आकारली होती. आयसीजेमध्ये साळवे यांनी केलेल्या युक्तिवादानंतर पाकिस्तानची बोलतीच बंद झाली होती. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानच्या तुरुंगात बंद भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती.

सामान्यांनाही एका दिवसात वजन वाढवण किंवा कमी करणं शक्य आहे? काय सांगत मेडिकल सायन्स

अपत्रा ठरताच विनेशचा कुस्तीला अलविदा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या विनेश फोगटकडून सुवर्ण पदकाची आशा होती. मात्र, अंतिम सामन्याला काही तास उरलेले असतानाच अवघे 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आले. हा करोडो भारतीयांससह सर्वांसाठीच मोठा धक्का होता. या धक्क्यातून भारतीय चाहते सावरत नाही तोच निराश झालेल्या विनेशने कु्स्तीतून थेट निवृत्तीच जाहीर करून टाकली.

Neeraj Chopra: नदीम पण आमचाच मुलगा… आम्ही समाधानी आहोत, नीरजच्या आईची प्रतिक्रिया

विनेशने याबाबत एक ट्विट करत ही घोषणा केली. या पोस्टमध्ये विनेशने तिच्या आईला उद्देशून संदेश लिहिला होता. यात तिने आई, कुस्तीने मला पराभूत केलं. माफ कर. तुझं स्वप्न माझी हिंमत सगळं काही तुटलं. आता यापेक्षा जास्त ताकद माझ्यात राहिलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. तुमच्या सगळ्यांची मी कायमच ऋणी राहिल असे ट्विट विनेश फोगटने केले होते.

follow us