Download App

मोदींनंतर आता पवारांच्या नावानेही होणार स्टेडियम? गहुंजेच्या नामांतर मागणीने धरला वेग

  • Written By: Last Updated:

महाराष्ट्रात सध्या नाव बदलण्याचे वारे सुरु आहे. काही महिन्यापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून त्याला छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले तसेच उस्मानाबाद या शहराचे नाव बदलून धाराशिव नाव देण्यात आले. तसेच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा मुखमंत्र्यांनी केली. तसेच देशातील सर्वात मोठ्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले.(MCA Stadium in Pune to be renamed after Ahmedabad’s Motera Stadium?)

याच धर्तीवर पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्याकडे केली आहे.

धनंजय मुंडे यांनी रोहित पवार यांना या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आयपीएलच्या धर्तीवर एमपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व आमदार रोहित पवार यांचे अभिनंदनही केले.

आक्रमक भाजप नेत्यांची ‘तलवार’ अचानक म्यान; फडणवीस-बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी

एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय त्याचबरोबर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या पद्मविभूषण खासदार शरद पवार यांचे क्रीडा विश्वात व विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे.

भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या निवृत्त क्रिकेटर्सला पेन्शन सुरू करणे यासारखे मोठे निर्णय पवारच्या कारकिर्दीत घेण्यात आले, याचाही उल्लेख धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स या आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय मुंडे हे स्वतः मैदानात पूर्णवेळ उपस्थित राहत आहेत.

Tags

follow us