Download App

MI vs GT : शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत सूर्याचे शतक, मुंबईचे गुजरातसमाेर 219 धावांचे लक्ष्य

  • Written By: Last Updated:

MI vs GT : आयपीएल 2023 च्या 57 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. गुजरात टायटन्सने 11 पैकी 8 सामने जिंकले असून गुणतालिकेत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने 11 पैकी सहा जिंकले असून ते चौथ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य दिले आहे.

मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगलीच धमाकेदार झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन यांनी 6.1 षटकात 61 धावांची भागीदारी केली. रोहितने 18 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकारांसह 29 धावा केल्या. त्याचवेळी इशानने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 31 धावा केल्या. फिरकी गोलंदाज राशिद खानने एकाच षटकात दोन्ही खेळाडूंना बाद केले. रशीदने नेहल वढेरालाही बाद केले. त्यामुळे मुंबईची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 88 धावा झाली.

आशिया कपमधून पाकिस्तान आऊट?; भारताचं पारडं जड

येथून सूर्यकुमार यादव आणि विष्णू विनोद यांनी 65 धावांची भागीदारी करत मुंबईला 150 धावांच्या पुढे नेले. विष्णू विनोदने दोन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. विनोदच्या बाद झाल्याचा सूर्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि त्याची झंझावाती फलंदाजी सुरूच राहिली. सूर्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. सूर्याने 49 चेंडूंत 11 चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 103 धावा केल्या.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, विष्णू विनोद, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन: ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ.

Tags

follow us