Download App

मोहम्मद सिराजने रागाच्या भरात केली शिवीगाळ, ‘त्यानंतर घडले असे कृत्य की…’

Mohammad Siraj Apology : यंदाचा आयपीएल सिझन जोरदार सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज स्पॉट फिक्सिंग (Spot fixing) प्रकरणात चर्चेत आला होता. रविवारी राजस्थान विरुध्द झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा सिराज वादात सापडला आहे. यावेळी सिराज मैदानावर गैरवर्तन करताना दिसला. त्याच्या ज्युनियर खेळाडूला शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 33 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूआणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बंगळुरूने रॉयल्सचा 7 धावांनी पराभव करत शानदार विजय नोंदवला. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही मैदानावर गैरवर्तन करताना दिसला. त्याच्या ज्युनियर खेळाडूला शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना 19व्या षटकाची आहे. जेव्हा सिराज गोलंदाजी करत होता.

क्रिकेट विश्वात खळबळ; फिक्सिंगसाठी भारताच्या ‘स्टार’ खेळाडूला मोठी ऑफर

वास्तविक, राजस्थान रॉयल्सला शेवटच्या 2 षटकात 30 धावांची गरज होती. मोहम्मद सिराजच्या 19व्या षटकात त्याने 13 धावा काढल्या. मोहम्मद सिराजला पाचव्या चेंडूवर ध्रुव जुरेलने षटकार ठोकला. सहाव्या चेंडूवर ध्रुव जुरेलने लाँग ऑनच्या दिशेने चेंडू मारला, तिथे महिपाल लोमररने थोडा उशीरा चेंडू टाकला. यामुळे मोहम्मद सिराजचा धावबाद चुकला आणि त्याने रागाने मैदानावर महिपाल लोमरारला शिवीगाळ केली.

मात्र, मोहम्मद सिराजने आपली चूक ओळखून महिपालची दोनदा माफी मागितली. महिपाल लोमरार हा भारताचा युवा खेळाडू आहे. तो आतापर्यंत टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकला नाही, मात्र त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 23 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 308 धावा केल्या आहेत.

Love Story: बालमैत्रिण ते पत्नी… अशी होती ‘वरुण धवन नताशा दलाल’ची लव्ह स्टोरी!

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

Tags

follow us