पाकिस्तानचे काही खेळाडू माझे यश…; हसन रझाच्या टीकेला शमीचं जोरदार प्रत्युत्तर

Mohammed Shami Slams Pakistan Former Cricketer: वर्ल्ड कप २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला विश्वचषक ट्रॉफी जिंकता आली नसली तरी खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने अनेक क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. 10 सामने जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय […]

Mohammed Shami च्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस; बॅडमिंटनचे दोन खेळाडूंना खेलरत्न

Mohammed Shami

Mohammed Shami Slams Pakistan Former Cricketer: वर्ल्ड कप २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला विश्वचषक ट्रॉफी जिंकता आली नसली तरी खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने अनेक क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. 10 सामने जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय संघातील खेळाडूंवर टीका करत आरोप केले. आता मोहम्मद शमीने (Mohammed Shami) पाकिस्तानी खेळाडूंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

तेलंगणाचा धुरळा बसताच ‘महाराष्ट्रावर’ फोकस : 288 जागा लढविण्याच्या घोषणेसह बीआरएसने थोपटले दंड 

पाकिस्तान खेळाडूंची टीका काय?
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या होत्या. यावरून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा याने बेताल वक्तव्य केले आहे. आयसीसी बहुधा भारतीय वेगवान गोलंदाजांना वेगवेगळे चेंडू देत आहे आणि त्यामुळेच ते भेदक मारा करू शकले. रझाच्या टीकेचा शमीने समाचार घेतला.

Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला, आरक्षणासाठी माझं… 

शमीचं प्रत्युत्तर
सध्या सोशल मीडियावर मोहम्मद शमीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो म्हणाला, तोच सर्वोत्तम खेळाडू असतो, जो वेळेत संघासाठी कामगिरी करतो. मी कोणाला दोष देत नाही. माझी तर इच्छा आहे की, असे 10 खेळाडू संघासाठी कामगिरी करण्यासाठी यावेत. मला कधीच वाईट वाटत नाही. जर तुम्हाला इतरांच्या यशात आनंद मिळत असेल तर तुम्हाला चांगला खेळाडू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी काहीच करत नसतो,  जे काही आहे ते देवाचे आहे.

https://www.youtube.com/watch?v=cBOjzYQ

मोहम्मद शमी पुढे म्हणाला, विश्वचषक चालू होता, मी खेळत नव्हतो. पण जेव्हा मी पहिल्यांदा पाच विकेट घेतल्या. यानंतर दुसऱ्या सामन्यात चार आणि तिसऱ्या सामन्यात पुन्हा पाच विकेट्स घेतल्या. पण, पाकिस्तानचे काही खेळाडूं माझे यश पचवू शकले नाीत. त्यांना माझी कामगिरी चांगलीच झोंबली. पाकिस्तानला त्यांचाच संघ सर्वोत्तम वाटतो. पण माझ्या मते, जो संघासाठी वेळेवर चांगली कामगिरी करतो तोच सर्वोत्तम असतो. मी फक्त मेहनत करणाऱ्या लोकांचा आदर करतो. आता पाकिस्तानचे खेळाडू नको त्या विषयावर वाद घालत आहेत.

 

 

Exit mobile version