Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला, आरक्षणासाठी माझं…
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. या दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे मराठवाड्यातील लातूरमध्ये एका तरूणाने आपलं जीवन संपवलं आहे. तर मरण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपवलं…
ही घटना मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील सावनगिरी येथे घडली आहे. या तरूणाने शेतामध्ये गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. करण युवराज सोळुंके असं या तरूणाचं नाव आहे. तर त्याचं वय 24 वर्ष आहे. दरम्यान या तरूणाने मरण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ज्यामध्ये त्याने आपण मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवत असल्याचं म्हटलं आहे.
‘इमेज खराब करण्याचा प्रयत्न असेल तर लखलाभ’; भारतात पाऊल ठेवताच बावनकुळेंचं सुनावलं
या तरूणाने मरण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे की, मी मराठा आरक्षणासाठी माझं जीवन संपवत आहे. हा तरूण बी कॉमचे शिक्षण घेतलेला आहे. मात्र तो बेरोजगार होता. तसेच त्याला दोघा भावात पाच एकर शेती आहे. तर या घटनेनंतर या तरूणाचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. त्यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत या तरूणाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
भाविकांसाठी मोठी बातमी! शनिशिंगणापूरमधील शनिदर्शन आजपासून भुयारी मार्गाने…
नातेवाईकांच्या या भूमिकेमुळे प्रशासना पुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळतातच निलंगा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ या घटनास्थळी धाव घेतली. तरूणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालायत पाठण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
गेल्या आठवड्याच जरांगे यांच्या जालना जिल्ह्यामध्येच एका चौदा वर्षीय मुलीने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं आहे. तिने देखील मरणापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्यामध्ये म्हटलं होत की, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं आणि माझे शब्द वाया जाता कामा नये. जिल्ह्यातील सोमेश्वर भागामध्ये ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.