Mohammed Siraj : इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल, मोहम्मद सिराज बाहेर; ‘या’ खेळाडूला संधी

Mohammed Siraj : नुकतंच बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Mohammed Siraj

Mohammed Siraj

Mohammed Siraj : नुकतंच बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजला देखील संधी देण्यात आली होती मात्र तो आता या मालिकेत खेळताना दिसणार नाही. तो या मालिकेतून बाहेर झाला असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार, वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सिराजला या मालिकेतून ब्रेक देण्यात आले आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक आणि संघ व्यवस्थापन यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. पुढील काही महिन्यात भारतीय संघाचा व्यस्त वेळापत्रक पाहता बीसीसीआयने सिराजला (Mohammed Siraj) रिकव्हरीसाठी वेळ दिला आहे.

सिराजच्या जागी या मालिकेसाठी संघात प्रसिद्ध कृष्णाला संघात संधी देण्यात आली आहे. प्रसिद्ध आता आयर्लंड आणि इंग्लंड या दोन्ही मालिकांमध्ये भारतासाठी खेळताना दिसणार आहे. या दौऱ्यांसाठी बीसीसीआयने श्रेयस अय्यरकडे टी20 संघाची कमान सोपवली आहे तर टिलक वर्मा भारतीय संघाचा उपकर्णधार असणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघात इशान किशन, अक्षर पटेल हर्षित राणा यांना देखील संधी दिली आहे.

LIC चे कार्यालय कुठे आहे? मला माहिती नाही; सेबी प्रकरणात राजेश महेताची प्रतिक्रिया –

आयर्लंड आणि इंग्लंड टी-20 मालिकेसाठी भारताचा अपडेटेड संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, टिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी आणि प्रसिद्ध कृष्णा.

Exit mobile version