‘विश्वचषक फिक्स आहे; अर्जेंटिना जिंकेल’ ; इजिप्शियन फुटबॉलपटूचा फिफावर मोठा आरोप

Mostafa Ziko : फिफा विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ 16 मध्ये झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने इजिप्तचा 3-2  ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत

Mostafa Ziko

Mostafa Ziko

Mostafa Ziko : फिफा विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ 16 मध्ये झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने इजिप्तचा 3-2  ने पराभव करत  उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तर दुसरीकडे या पराभवानंतर इजिप्तचा फुटबॉलपटू मुस्तफा झिको याने फिफावर गंभीर आरोप करत ही स्पर्धा फिक्स्ड असल्याचं म्हटलं आहे. अर्जेंटिनाला विजय करण्यासाठी हे सर्व घडवून आणले जात असल्याचा दावा मुस्तफा झिकोने केला आहे.

सामन्यात इजिप्तने आक्रमक खेळ करत 2-0  अशी आघाडी घेतली होती मात्र सामना संपण्याच्या शेवटच्या 20 मिनिटात अर्जेंटिनाने पुनरागमन करत बाजी मारली. तर इजिप्तचा एक गोल रद्द करण्यात आला होता ज्यामुळे झिकोने फिफा विश्वचषक 2026 फिक्स्ड असल्याचा आणि पंचांनी पक्षापातीपणा केल्याचा आरोप केला आहे.

सामन्यानंतर इजिप्तचा (Egypt) मुस्तफा झिको (Mostafa Ziko) प्रचंड संतापलेला दिसला. ‘व्हीएआर’ (VAR) द्वारे त्याचा गोल रद्द केल्यामुळे तो नाराज होता. त्याने पंच फ्रँकोइस लेटेक्सियर यांच्यावर टीका केली आणि संपूर्ण स्पर्धाच ‘फिक्स्ड’ असल्याचा दावा केला. झिको म्हणाला, पंच चुकीचे आहेत. त्यांनी एका संपूर्ण राष्ट्राची मेहनत वाया घालवली आहे. विश्वचषक अर्जेंटिनाला (Argentina) जिंकवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तेच ही स्पर्धा जिंकणार आहेत. हे अन्यायकारक आहे, पूर्णपणे अन्यायकारक आहे. सुरुवातीपासूनच पंच आमच्या विरोधात होते. आम्हाला 2-0  ने जिंकू दिले गेले नाही. हा उघड अन्याय आहे. ही स्पर्धा ‘फिक्स्ड’ आहे.

20 मिनिटांत सामना फिरला; अर्जेंटिनाची क्वार्टरफायनलमध्ये एन्ट्री; इजिप्तचा पराभव-

नेमकं प्रकरण काय? 

पहिल्या हाफमध्ये यासर इब्राहिमच्या गोलमुळे इजिप्तने आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये मुस्तफा झिकोने संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. इजिप्तची आघाडी 3-0 अशी होऊ शकली असती, परंतु ‘व्हीएआर’मुळे एक गोल रद्द करण्यात आला होता. 79 व्या मिनिटाला ख्रिस्टियन रोमेरोने अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला. त्यानंतर 83 व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने गोल करत  सामना 2-2 असा बरोबरीत आणला. त्यानंतर, स्टॉपेज टाइममध्ये (90+2 मिनिटाला) एन्झो फर्नांडिसने निर्णायक गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली.

Exit mobile version