Download App

WPL प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ‘मुंबई इंडियन्स’

मुंबई : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) (51) शानदार अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) महिला प्रीमियर लीग (WPL 2023) मध्ये मंगळवारी गुजरात जायंट्सचा 55 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये (WPL playoffs) पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

विजयरथवर स्वार झालेल्या मुंबई इंडियन्सने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सवर 162 धावा केल्या आणि त्यानंतर गुजरात जायंट्सला 20 षटकांत 9 गडी गमावून 107 धावांवर रोखले. मुंबई इंडियन्स देखील या स्पर्धेत आतापर्यंत 200 पेक्षा कमी स्कोअर यशस्वीपणे राखणारा पहिला संघ बनला आहे.

गुजरात जायंट्ससाठी हरलीन देओलने 22, एस मेघनाने 16, कर्णधार स्नेह राणाने 20 आणि सुषमा वर्माने नाबाद 18 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून हेली मॅथ्यूज आणि सिव्हर ब्रंटने प्रत्येकी तीन आणि अमेलिया केरने दोन तर इसी वोंगने एक गडी बाद केला.

Double Marriage Case : न्यायालयाबाहेरच निघाला तोडगा! नवऱ्याची केली वाटणी… ३-३ दिवस दोघींबरोबर राहणार!

मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील पाच सामन्यांतील हा सलग पाचवा विजय आहे. संघाचे आता 10 गुण झाले आहेत आणि स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोबर गुजरात जायंट्सला पाच सामन्यांमधला चौथा पराभव स्वीकारावा लागला आहे. संघ दोन गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

तत्पूर्वी, कर्णधार हरनमप्रीत कौरच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आठ गडी बाद 162 धावा केल्या. 30 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावा करण्याबरोबरच अमेलिया केर (19) सोबत चौथ्या विकेटसाठी 51 धावा जोडून अखेरच्या षटकात धावगती वाढवली. सलामीवीर यस्तिका भाटिया (44) आणि नेट स्कायव्हर ब्रंट (36) यांनी दुस-या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात मिळवून दिली.

गुजरातकडून अॅश्ले गार्डनरने 34 धावांत तीन बळी घेतले. कर्णधार स्नेह राणाने किफायतशीर गोलंदाजी करताना चार षटकांत 17 धावा आणि एक बळी मिळवला. गुजरातची कर्णधार स्नेह राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि डावाच्या चौथ्या चेंडूवर ऍशलेग गार्डनरने हेली मॅथ्यूजला (0) सोफिया डंकलेकरवी झेलबाद केले.

नॅट सायव्हर ब्रंट सुरुवातीपासूनच चांगल्या फार्ममध्ये दिसली. तिने तिसऱ्या षटकात स्नेहच्या चेंडूवर चौकार मारून मुंबईसाठी पहिला चौकार लगावला आणि त्यानंतर किम गर्थच्या चेंडूवर दोन चौकार मारले.

यास्तिकने संथ सुरुवातीनंतर लय पकडली. पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने एका विकेटच्या मोबदल्यात 40 धावा केल्याने तिने तनुजा कंवरचे सलग दोन चौकारांसह स्वागत केले. गुजरातच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये तगडी गोलंदाजी केली. मुंबईच्या धावांचे अर्धशतक नवव्या षटकात पूर्ण झाले.

यस्तिकाने अॅनाबेल सदरलँडवर षटकार मारून धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. स्कायव्हर ब्रंटनेही किमच्या लागोपाठ चेंडूंवर षटकार आणि चौकार मारले पण त्याच षटकात ती एलबीडब्ल्यू झाली. तिने 31 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला.

कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत झालेल्या गैरसमजातून यास्तिकाही धावबाद झाली. तिने 37 चेंडूंचा सामना करताना पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. हरमनप्रीत आणि अमेलिया केर (19) यांनी 14व्या षटकात संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली.

गार्डनर आणि सदरलँडवर प्रत्येकी दोन चौकारांसह हरमनप्रीतने धावगती वाढवली. किमने तनुजाच्या गोलंदाजीवर अमेलियाचा शानदार झेल घेत हरनामप्रीतसोबतची 51 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. स्नेहने आपल्याच चेंडूवर इसी वोंगचा (00) झेल घेत मुंबईला पाचवा धक्का दिला.

हरमनप्रीतने 19व्या षटकात सदरलँडला दोन षटकार ठोकले पण हुमैरा काझी (2) अनावश्यक दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाली. गार्डनरवर लागोपाठ दोन चौकारांसह हरमनप्रीतने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले पण पुढच्याच चेंडूवर हरलीन देओलने चौकारावर अप्रतिम झेल घेतला.

Tags

follow us