IPL 2027 : बीसीसीआयकडून तसेच सर्व संघ मालकांकडून आयपीएल 2027 साठी जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. यातच पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स स्टार खेळाडू रोहित शर्माला कर्णधार करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोराने सुरु होती मात्र आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने या अफवांना पूर्णविराम देत कर्णधारपदाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती दिली आहे.
रोहित शर्मा कर्णधार होणार नाही
रोहित शर्माची (Rohit Sharma) कर्णधार म्हणून नियुक्ती होणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी दिली आहे. आगामी हंगामासाठी कर्णधारपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. जर हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स सोडले तर रोहित शर्माव्यतिरिक्त संघाकडे या भूमिकेसाठी इतर अनेक सक्षम उमेदवार आहेत. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2027 साठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) हे पुढील कर्णधारच्या शर्यतीत आघाडीवर असून न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर (Mitchell Santner) देखील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे.
हार्दिक मुंबई इंडियन्स सोडणार?
तर दुसरीकडे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सोडणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. संघाने 2024 मध्ये हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदी नियुक्ती केली होती मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. असे वृत्त आहे की पांड्याचे संघासोबतचे संबंध बिघडले, ज्यामुळे त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या एका सूत्राने हे देखील सांगितले की, संघ हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) ‘ट्रेड’च्या शक्यता पडताळून पाहत आहे, तर इतर फ्रँचायझी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी अनुकूल कराराची वाट पाहत आहेत. आतापर्यंत, संघाला पांड्यासाठी कोणतीही योग्य ऑफर मिळालेली नाही.
मोदी सरकारमध्ये पाच नवीन मंत्री, 15 दिवसांच्या आत मोठी घोषणा, श्रीकांत शिंदेंना संधी? –
आयपीएलचा लिलाव कधी होणार?
माहितीनुसार सर्व संघांना नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत त्यांची ‘रिटेन्शन लिस्ट’ (संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी) जाहीर करावी लागेल. त्यानंतर, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीएल 2027 चा ‘मिनी-लिलाव’ (Mini Auction) आयोजित केला जाईल.
