ब्रेकिंग: मुंबई इंडियन्सने पुन्हा रोहित शर्माकडे सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी; 2027 च्या IPL साठी मोठा निर्णय!

Rohit Sharma Mumbai Indians Captain : मुंबई इंडियन्सने 2027 साठी पुन्हा रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवलं.

Rohit Sharma Mumbai Indians Captain

Rohit Sharma Mumbai Indians Captain

Rohit Sharma Mumbai Indians Captain: आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सने आगामी 2027 च्या हंगामासाठी मोठा निर्णय घेतला आहे. संघाने पुन्हा एकदा रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. पाच वेळा आयपीएलचं (IPL 2027) विजेतेपद मिळवून देणाऱ्या आपल्या जुन्या कर्णधाराकडे मुंबई इंडियन्सने पुन्हा धाव घेतली आहे. गेल्या काही हंगामांतील खराब कामगिरीनंतर संघाला पुन्हा एकदा स्थिरता मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे.

डिलिमिटेशनच्या विधेयकाला ना पाठिंबा, ना विरोध; ठाकरेंच्या शिवसेनेची वेट अँड वॉचची भूमिका!

मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्येही मोठे बदल

रोहितकडे कर्णधारपद सोपवण्याआधी मुंबई इंडियन्सने आपल्या कोचिंग स्टाफमध्येही मोठे बदल केले आहेत. महेला जयवर्धने यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आलं असून, त्यांच्या जागी कायरन पोलार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणारे लसिथ मलिंगा आणि पारस म्हांब्रे यांच्या जागी मिचेल मॅक्लेनघन यांना संधी देण्यात आली आहे.

याशिवाय धवल कुलकर्णी यांची विकासात्मक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून, तर रॉबिन उथप्पा यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सगळ्या बदलांमध्ये रोहित शर्माची छाप असल्याची चर्चा आहे.

हार्दिक पांड्याची साथ सोडल्यानंतर रोहितकडे जबाबदारी

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहितकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्याचा मार्ग मोकळा झाला. हार्दिकने मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर पंजाब किंग्स संघात प्रवेश केला आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्याच्या नेतृत्वाच्या काळात ड्रेसिंग रूममधील वातावरण आणि खेळाडूंमधील समन्वय यावरही प्रश्न उपस्थित झाले होते.

Video : प्रत्येक व्यवहारात वापरला जाणारा OTP सुरू कसा झाला?; वाचा भन्नाट स्टोरी…

2024 मध्ये गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर हार्दिकला संघातील खेळाडूंचा विश्वास मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागल्याची चर्चा होती. त्याचवेळी चाहत्यांनीही त्याच्या कर्णधारपदावर नाराजी व्यक्त केली होती.

सहा वर्षांपासून विजेतेपदाची प्रतीक्षा

2024 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सला 14 सामन्यांत केवळ 8 गुण मिळाले आणि संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. 2025 मध्ये संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला, मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित सातत्य राखता आलं नाही. 2026 मध्येही संघाची कामगिरी घसरली आणि मुंबई इंडियन्सला 8 गुणांसह नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

मुंबई इंडियन्सला गेल्या सहा वर्षांपासून आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे संघाला पुन्हा विजयाच्या मार्गावर आणण्यासाठी अनुभवी रोहित शर्माकडे नेतृत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इंडिया आघाडीत डिलिमिटेशनवरून मोठा भूकंप! लालूंच्या RJD चा धक्कादायक निर्णय, काय घडलं?

रोहितकडे किती काळ राहणार कर्णधारपद?

रोहित शर्माकडे सोपवलेली ही जबाबदारी केवळ 2027 च्या हंगामापुरती आहे की तो दीर्घकाळ संघाचं नेतृत्व करणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 2028 मध्ये आयपीएलचा नवा मीडिया राइट्स करार आणि मेगा ऑक्शन होणार आहे. त्यावेळी रोहित शर्माचं वय 40 वर्षे असेल. त्यामुळे भविष्यातील कर्णधार म्हणून तिलक वर्माच्या नावाचीही चर्चा आहे.

सध्या तरी मुंबई इंडियन्सने आपल्या सर्वात यशस्वी कर्णधारावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. आता रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स पुन्हा विजेतेपद मिळवणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

 

Exit mobile version