New Zealand Trent Boult Retirement : न्यूझीलंडच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने निवृत्तीची मोठी घोषणा केली आहे. तो 17 जून रोजी टी-20 विश्वचषकातील शेवटचा सामना खेळणार आहे. हा त्याचा शेवटचा टी-20 विश्वचषक सामना असेल, असे त्याने स्पष्ट केले आहे. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर शनिवारी क गटातील सामन्यात युगांडाविरुद्ध विजयी कामगिरी केल्यानंतर बोल्टने माध्यमांशी संवाद साधला. ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना पापुआ न्यू गिनीशी होणार आहे. हा सामना सोमवारी होणार आहे.
Trent Boult has confirmed that he is playing his last #T20WorldCup 🗣
Full story 👉 https://t.co/RWtZOceRNR #NZvUGA pic.twitter.com/jBSrCqXwu2
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 15, 2024
टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाची कामगिरी निराशाजनक राहिल्याने हा संघ आधीच सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. क गटातील या संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले असून यातील दोन सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. संघाच्या या खराब कामगिरीनंंतर ट्रेंट बोल्टने मोठे पाऊल उचलत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. युगांडाविरुद्धच्या विजयानंतर हा माझा शेवटचा टी-20 विश्वचषक असेल असे ट्रेंट बोल्ट म्हणाला.
बाबर आजमसह पूर्ण टीम तुरूंगात जाणार?; भारताने हरवल्यानंतर पाकिस्तानात दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा
संघाचा परफॉर्मन्स खराब
सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाला अफगाणिस्तानने वाईटरित्या पराभूत केले. यानंतर दुसऱ्या ‘करो या मरो’च्या सामन्यातही किवी संघ वेस्ट इंडिजसमोर 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकला नाही. संघाच्या या खराब कामगिरीमुळे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने संघाने सलग तीन विजय मिळवत सुपर-8 मध्ये प्रवेश केला. ” संघाला खरोखरच खराब सुरुवात नको होती. पण हा पराभव पचवणं खूप कठीण आहे. आमचा संघ स्पर्धेत प्रगती करू शकला नाही याबद्दल सर्वच खेळाडू निराश असल्याचे बोल्ट म्हणाला.
कतरच्या खेळाडूंची चिटींग अन् भारताचं स्वप्न भंगलं; ‘सोशल’वरील ‘त्या’ ट्रेंडचं सत्य काय?
T20 विश्वचषकात कशी राहिली बोल्टची कामगिरी
2024 च्या T20 विश्वचषकात बोल्टने चांगली गोलंदाजी केली. बोल्टने 3 सामन्यात 6.42 च्या सरासरीने आणि 3.75 च्या इकॉनॉमीने 7 विकेट्स घेतल्या. 3/16 ही त्याची सध्याच्या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती. 2014 मध्ये बोल्ट पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप खेळताना दिसला होता. बोल्टच्या नावावर 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 81 विकेट आहेत.