राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, शमीसह 26 जणांना अर्जुन पुरस्कार, ‘या’ 2 खेळाडूंना खेलरत्न

Mohammed Shami : यंदा देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna Awards) बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. तर स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीचाही (Mohammed Shami) अर्जुन पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 9 जानेवारीला प्रदान […]

Mohammed Shami

Mohammed Shami

Mohammed Shami : यंदा देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna Awards) बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. तर स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीचाही (Mohammed Shami) अर्जुन पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे.

हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 9 जानेवारीला प्रदान करण्यात येणार आहेत. क्रीडा मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत.

अर्जुन पुरस्कार 26 खेळाडूंना देण्यात येणार
क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित केले जाईल. हे सर्व पुरस्कार या खेळाडूंना त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणार आहेत.

खालीलप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहेत

खेलरत्न पुरस्कार
-चिराग शेट्टी – बॅडमिंटन
– सात्विकसाईराज रँकीरेड्डी – बॅडमिंटन

अर्जुन पुरस्कार
ओजस प्रवीण देवतळे – धनुर्विद्या
अदिती गोपीचंद स्वामी – धनुर्विद्या
श्रीशंकर – ऍथलेटिक्स
पारुल चौधरी – अॅथलेटिक्स
मोहम्मद हुसामुद्दीन – बॉक्सर
आर वैशाली – बुद्धिबळ
मोहम्मद शमी – क्रिकेट
अनुष अग्रवाल – घोडेस्वारी
दिव्यकृती सिंग – अश्वारूढ पोशाख
दीक्षा डागर – गोल्फ
कृष्ण बहादूर पाठक – हॉकी
सुशीला चानू – हॉकी
पवन कुमार – कबड्डी
रितू नेगी – कबड्डी
नसरीन – खो-खो
पिंकी – लॉन बॉल्स
ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर – शूटिंग
ईशा सिंग – शूटिंग
हरिंदर पाल सिंग – स्क्वॉश
अहिका मुखर्जी – टेबल टेनिस
सुनील कुमार – कुस्ती
अंतिम – कुस्ती
रोशिबिना देवी – वुशू
शीतल देवी – पॅरा धनुर्विद्या
अजय कुमार – अंध क्रिकेट
प्राची यादव – पॅरा कॅनोइंग

Exit mobile version