Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये सर्वोत्तम (Paris Olympics) कामगिरी करण्यात चुकलेल्या नीरज चोप्राने याची भरपाई (Neeraj Chopra) केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत केलेलं रेकॉर्ड मोडलं आहे. नीरजने ऑलिम्पिकमध्ये 89.45 मीटर भाला फेकला होता. आता त्याने लुसाने डायमंड लीग स्पर्धेत 89.49 मीटर थ्रो फेकत आपलंच रेकॉर्ड मोडीत काढलं आहे. या स्पर्धेत त्याचा हा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट थ्रो होता. यानंतरही त्याला पहिला क्रमांक मात्र मिळवता आला नाही. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने पहिला नंबर मिळवला. त्याने 90.61 मीटर दूरवर भाला फेकला. पीटर्स पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. या स्पर्धेत त्याला ब्राँझ पदक मिळालं होतं. नीरज दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्याला या स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळालं होतं.
मनू भाकरची आई नीरज चोप्राला भेटली, रिश्ता पक्का? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण
लुसाने डायमंड लीग स्पर्धेत नीरजने सीजनमधील बेस्ट थ्रो केला. पहिल्या थ्रोमध्ये त्याने 82.10 मीटर भाला फेकला. दुसऱ्या प्रयत्नात 83.21 मीटर भाला फेक केली. तिसऱ्या थ्रोमध्ये 83.13 मीटर, चौथ्या थ्रो मध्ये 82.34 मीटर, पाचव्या थ्रोमध्ये 85.58 मीटर तर सहाव्या आणि शेवटच्या थ्रोमध्ये 89.49 मीटर भालाफेक करत नवं रेकॉर्ड केलं.
नीरज चोप्रा याही वेळेस 90 मीटरचा आकडा गाठू शकला नाही. नीरज बऱ्याच दिवसांपासून 90 मीटरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याला यश मिळालेलं नाही. याआधी नीरजने 2022 मध्ये त्याच्या करिअरमधील बेस्ट थ्रो केला होता. यावेळी त्याने 89.94 मीटर थ्रो फेकला होता. आता नीरज चोप्रा 90 मीटरचा आकडा कधी गाठणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये नीरजच्या यशाने भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलेच रौप्य पदक मिळाले होते. एकूण सहा थ्रोपैकी नीरजचा केवळ दुसरा थ्रो लीगल ठरला. इतर सर्व थ्रो फॉऊल ठरले. त्याचवेळी पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने नीरज चोप्राचे टोकियो ऑलिम्पिकमधील 87.58 चे रेकॉर्ड मोडून काढत सुवर्णपदक पटकावलं होतं. नदीम याने 92.97 चा थ्रो फेकत ऑलिम्पिक रेकॉर्ड नोंदविले.
olympics 2024 : नीरज चोप्राची पुन्हा कमाल! भारताला भालाफेकमध्ये रौप्य पदक