Delhi Wrestlers Protest : दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी आज (दि.25) पत्रकार परिषद (Press conference)घेऊन तक्रार नोंदवून न घेण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी कारवाईची मागणी केली आहे
कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा वाढत चालला आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि क्रिकेटचा पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देवही (Kapil Dev) कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. नीरज चोप्रा यांनी एक ट्विट करत याप्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी करून खेळाडूंना न्याय देण्याची मागणी केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांशी दोस्ती पण… अब्दुल सत्तारांनी घेतला यूटर्न
नीरज चोप्रा याने आज सकाळी ट्विट करत लैंगिक शोषण प्रकरणी न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या कुस्तीपटूंना समर्थन दिले. खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याचे पाहून वाईट वाटतंय. देशाचे प्रतिनिधीत्व आणि आपल्याला अभिमान वाटावी अशी कामगिरी करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे एक देश म्हणून आपली जबाबदारी आहे, मग तो खेळाडू असो किंवा नसो, असे नीरज चोप्रा याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) April 28, 2023
याच ट्विटमध्ये तो पुढे म्हणतो की जे घडत आहे ते घडायला नको होते. हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा असून तो निःपक्षपणे आणि पादरर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. न्यायासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाई करणे आवश्यक आहे.
देशाला क्रिकेटचा विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनीही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. बजरंग पुनियासह विनेश फोगाट आणि अन्य कुस्तीपटूंच्या पत्रकार परिषदेचा फोटो कपिल यांनी आपल्या स्टोरीवर ठेवला असून याखाली ‘त्यांना कधी न्याय मिळेल का?’, असा सवाल उपस्थित केला आहे.
https://letsupp.com/national/supreme-court-question-to-central-govt-39710.html
दरम्यान या आधीही ऑलिम्पिक कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाले होते की, पोलीस एफआयआर का नोंदवत नाहीत? हे मला कळत नाही. सर्वोच्च न्यायालयावरील आमचा विश्वास आणखी वाढला आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. आमच्या मंचावर सर्वांचे स्वागत आहे. राजकीय पक्ष असो किंवा इतर कोणीही, भाजपला यायचे असेल तर त्यांचेही स्वागत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बजरंग म्हणाला की, तुम्ही कोणत्या व्यवस्थेबद्दल बोलत आहात? तुम्ही संपूर्ण व्यवस्थाच उद्ध्वस्त करून टाकली आहे. कायद्यापेक्षा मोठे काणीही नाही. आमच्यावर जे राजकारण झाले ते आम्हाला पुन्हा नको आहे. दुसरीकडे, कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नव्हते, अहवाल कसा सादर केला गेला? असाही सवाल यावेळी उपस्थित केला. बबिता फोगाटने सांगितले की, तिला अहवालावर सही करण्यास भाग पाडले गेले.
कुस्तीपटू विनेश फोगटने सांगितले की, कोणत्याही महिलेबाबत काही घडले तर ते सर्व सांगणे अवघड असते. आम्हाला धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे करू नका. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.