Download App

olympics 2024 : नीरज चोप्राची पुन्हा कमाल! भारताला भालाफेकमध्ये रौप्य पदक

भारताचा स्टार भालफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. 89.45 मीटरचा थ्रो करत नीरजने हे यश मिळविले आहे.

पुणे : भारताचा स्टार भालफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. 89.45 मीटरचा थ्रो करत नीरजने हे यश मिळविले आहे. नीरजच्या यशाने भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलेच रौप्य पदक मिळाले आहे. एकूण सहा थ्रोपैकी नीरजचा केवळ दुसरा थ्रो लीगल ठरला. इतर सर्व थ्रो फॉऊल ठरले.  त्याचवेळी पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने नीरज चोप्राचे टोकियो ऑलिम्पिकमधील 87.58 चे रेकॉर्ड मोडून काढत सुवर्ण पदक पटकावले आहे. नदीम याने 92.97 चा थ्रो फेकत ऑलिम्पिक रेकॉर्ड नोंदविले आहे. (Neeraj Chopra settled for the silver medal at the Paris Olympics by securing an attempt of 89.45 meters)

follow us