Rachin Ravindra : न्यूझीलंडला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी स्टार खेळाडू जखमी

Rachin Ravindra : भारतीय संघ पुढील महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ पाच टी20, तीन एकदिवसीय आणि दोन

Rachin Ravindra

Rachin Ravindra

Rachin Ravindra : भारतीय संघ पुढील महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ पाच टी20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण मानली जात असताना न्यूझीलंडला या मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, संघाचा स्टार खेळाडू रचिन रवींद्र दुखापतग्रस्त झाला आहे. एका प्रमोशनल शूट दरम्यान त्याला दुखापत झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शूटदरम्यान कॅच घेण्याचा प्रयत्न करताना त्याला दुखापत झाली आणि त्याचा खांदा निखळला (Dislocated). भारतासोबतची मालिका सुरू होण्यास आता एक महिना बाकी आहे. तर दुसरीकडे ‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, रचिन रवींद्रला (Rachin Ravindra) बुधवारी, 16 सप्टेंबर रोजी ही दुखापत झाली. ऑकलंडमध्ये ‘स्काय’ (Sky) सोबतच्या एका प्रमोशनल शूटदरम्यान ‘डायव्हिंग कॅच’ घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा उजवा खांदा निखळला. त्यामुळे आता भारतासोबतच्या टी20 मालिकेत त्याच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

शुक्रवारी (18 सप्टेंबर) एका वैद्यकीय तज्ज्ञाने रचिन रवींद्रची प्राथमिक तपासणी केली आणि त्यात कोणतीही मोठी हानी (Structural Damage) झाली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तो कधीपर्यंत पुन्हा खेळू शकेल, हे त्याच्या ‘रिहॅबिलिटेशन’च्या सुरुवातीच्या टप्प्यातील प्रगतीवर अवलंबून असेल. भारतासोबतची पाच सामन्यांची टी20 मालिका 22 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

तर न्यूझीलंडचे परफॉर्मन्स मॅनेजर माईक सँडल यांनी सांगितले की, शूटदरम्यान कॅच घेण्याचा प्रयत्न करताना रवींद्र एका ‘सेफ्टी मॅट’वर चुकीच्या पद्धतीने पडला. सँडल म्हणाले, “ही एक गंभीर दुखापत होती. रचिनबाबत आम्हाला खूप वाईट वाटत आहे आणि तो पूर्णपणे बरा होऊन लवकरात लवकर मैदानावर परत येईल, याची खात्री करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आमच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या सर्व व्यावसायिक शूट्सप्रमाणेच, या उपक्रमांबाबतही सर्व पक्षांची आधीच सहमती झाली होती आणि योग्य सुरक्षा उपाययोजनाही केल्या होत्या. ही एक दुर्दैवी आणि अनपेक्षित घटना (Freak Accident) होती आणि भविष्यात अशा कार्यक्रमांसाठी आम्ही आमच्या प्रक्रियेचा आढावा घेत राहू.”

NCMC कार्डच्या नियमांत बदल; आता OTP च्या माध्यमातून करता येणार नोंदणी

तर याबाबत न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर म्हणाले की, संघ रवींद्रच्या बरे होण्याच्या प्रक्रियेकडे काळजीपूर्वक लक्ष देईल, विशेषतः पुढील काळात कसोटी सामन्यांचे व्यस्त वेळापत्रक पाहता. वॉल्टर म्हणाले, “पुढील सहा महिन्यांत कसोटी क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक पाहता, रचिन पूर्णपणे तयार होण्याआधीच त्याला घाईघाईने परत आणण्याची आमची इच्छा नाही. त्याच्या रिहॅबिलिटेशनची योग्य काळजी घेतली जात आहे.

Exit mobile version