NCMC कार्डच्या नियमांत बदल; आता OTP च्या माध्यमातून करता येणार नोंदणी
NCMC Card : एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी कार्डच्या प्रक्रियेत बदल केला आहे. एसटी महामंडळाने
NCMC Card : एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी कार्डच्या प्रक्रियेत बदल केला आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासांना बायोमेट्रिक जुळत नसल्याने कार्ड नोंदणी करताना अडचणी येत होत्या. त्यांना आता आधार ओटीपीच्या माध्यमातून नोंदणी करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
21 सप्टेंबरपासून मिळणार आधार OTP चा पर्यायएनसीएमसी कार्ड नोंदणी (NCMC Card) प्रक्रियेत 21 सप्टेंबर 2026 पासून आधार ओटीपीने नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे आता ज्या प्रवाशांची बायोमेट्रिक पडताळणी अयशस्वी झाली असेल त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे ज्यांचे कार्ड हरवलं आहे त्यांना आता 199 रुपये शुल्क भरुन नव्याने कार्ड घेता येणार आहे.
एसटी महामंडळाने (ST Corporation) दिलेल्या माहितीनुसार, 19 सप्टेंबरपर्यंत एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या प्रवाशांना 25 सप्टेंबरपासून कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना QR कोड असलेली पावती देखील मिळणार आहे. ही पावती 30 दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असल्याची माहिती देखील महामंडळाकडून देण्यात आली आहे.
LIC प्रकरणात तब्बल 2,684 कोटी रुपयांची फसवणूक; अनिल अंबानींवर गुन्हा दाखल
तर दुसरीकडे महिला आणि 65 ते 75 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. मात्र कार्ड नोंदणी, सर्व्हरवरील ताण आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना समस्यांना येत असल्याने ही सक्ती 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.