Download App

NZ vs SL : टिम साइफर्टच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने तिसरा टी-20 सामना जिंकला

  • Written By: Last Updated:

NZ vs SL : न्यूझीलंडने तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेवर चार विकेट राखून विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली. टीम सिफर्टने 48 चेंडूत 88 धावांची खेळी केली. कुसल मेंडिसच्या 48 चेंडूत 73 धावांच्या जोरावर श्रीलंकेने 6 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 19.5 षटकांत 6 गडी गमावून 183 धावा केल्या. न्यूझीलंडने दुसरा सामना नऊ गडी राखून जिंकला तर पहिला सामना श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता.

सिफर्टने आपल्या खेळीत दहा चौकार आणि तीन षटकार मारले. त्याने पहिल्या विकेटसाठी चॅड बोवेस सोबत 53 धावा आणि कर्णधार टॉम लॅथम सोबत दुसऱ्या विकेटसाठी 52 चेंडूत 84 धावा जोडल्या. सिफर्टची T20I मधील ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे, त्याची मागील सर्वोत्तम खेळी 85 धावांची होती.

Eknath Shinde यांचा पवार, ठाकरेंवर निशाणा… म्हटले काहींना हिंदूंची अलर्जी होतेय! 

शेवटच्या षटकात सात विकेट्स शिल्लक असताना 10 धावा हव्या होत्या. चॅपमनने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर पुढचा चेंडू वाईड झाला पण बायची धाव घेताना नीशम धावबाद झाला. पुढच्याच चेंडूवर मिशेल बाद झाला. डावाच्या चौथ्या चेंडूवर बाईची धाव आली आणि पाचव्या चेंडूवर रचिन रवींद्रने दोन धावा घेत विजय मिळवला.

Tags

follow us