Download App

नितीश कुमार रेड्डीचे ग्रह फिरले, फसवणुकीचा आरोप; प्रकरण न्यायालयात, काय घडलं?

टीम इंडियाचा उदयोन्मुख (Team India) खेळाडू नितीश कुमार रेड्डीच्या अडचणी (Nitish Kumar Reddy) वाढल्या आहेत.

Nitish Kumar Reddy News : टीम इंडियाचा उदयोन्मुख (Team India) खेळाडू नितीश कुमार रेड्डीच्या अडचणी (Nitish Kumar Reddy) वाढल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो संघात होता. परंतु, दुखापतीमुळे त्याला बाहेर व्हावे लागले. त्यानंतर नितीश रेड्डी तातडीने भारतात परतला. येथे आल्यानंतर त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला न्यायालयात दाखल झाला आहे. या बातमीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार बंगळुरू येथील टॅलेंट मॅनेजमेंट फर्म स्क्वायर द वन ने नितीश रेड्डीच्या विरुद्ध कायदेशीर खटला दाखल केला आहे. नितीशने पाच कोटींहून अधिक रकमेची थकबाकी अदा केलेली नाही असा आरोप करण्यात आला आहे. आता हे प्रकरण कोर्टात गेलं आहे आणि या प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात 28 जुलै रोजी होणार आहे.

न्यूज 18 क्रिकेटनेक्स्टने स्क्वायर द वन प्रायव्हेट लिमिटेडचे निदेशक शिव धवन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या घडामोडींना दुजोरा दिला. प्रकरण न्यायालयात असल्याने यावर जास्त भाष्य करण्यास नकार दिला.

टीम इंडिया बदलणार, अभिषेक-नितीश रेड्डीबाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय?

वादाचं कारण नेमकं काय?

रिपोर्ट्सनुसार, नितीश कुमार रेड्डी आणि त्याची पूर्व मॅनेजमेंट एजन्स स्क्वायर द वन यांच्यात वाद झाला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर भारतीय खेळाडूने एका क्रिकेटरची मदत घेत नव्या मॅनेजमेंट एजन्सीशी करार केला. विशेष म्हणजे नितीशचा स्क्वायर द वन बरोबर तीन वर्षांचा करार होता.

टीव्ही 9 भारतवर्षने रिपोर्ट्सचा हवाला देत सांगितले की नितीश रेड्डी सुद्धा न्यायालयात जाण्यास तयार आहे. त्याने एजन्सीला पैसे देण्यास नकार दिला आहे. एंडोर्समेंटची डील मिळवण्यात एजन्सीचा काहीही संबंध नाही असा नितीश रेड्डीचा दावा आहे. हा करार त्याने स्वतःच्या हिंमतीवर मिळवला. दरम्यान, या सर्व प्रकरणात अद्याप नितीश कुमार रेड्डीची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

IND vs ENG कसोटी मालिका कधी आणि कुठे पाहता येणार? एका क्लीकवर जाणून घ्या सर्वकाही

follow us