टीम इंडिया बदलणार, अभिषेक-नितीश रेड्डीबाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय?

BCCI Central Contract

BCCI Central Contract : भारतीय संघ जुन महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्यापूर्वी सर्वांचे लक्ष बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टकडे (BCCI Central Contract) लागले आहे. 2025-26  साठी बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणाल संधी देणार आणि कोणाला डच्चू देणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे या कॉन्ट्रॅक्टबाबत एक मोठी अपडेटसमोर आली आहे. या बातमीनुसार बीसीसीआय (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये युवा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला संधी देऊ शकते. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय पुढील काही दिवसात नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करु शकते आणि या कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता देखील कमी आहे. तसेच यंदा बीसीसीआय काही नवीन खेळांडूना देखील संधी देऊ शकते अशी माहिती देखील सध्या समोर आली आहे.

युवा फलंदाज अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) याला ग्रेड सी मध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रेड सी मध्ये खेळाडूला दरवर्षी 1 कोटी रुपये मिळतात. तर या यादीत नितीश कुमार रेड्डीला (Nitish Kumar Reddy) देखील ग्रेड सी मध्ये स्थान मिळण्याची आपेक्षा आहे. अष्टपैलू नितीश रेड्डीने आतापर्यंत पाच कसोटी आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत त्याने शानदार कामगिरी केली होती.

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का! संग्राम थोपटे पक्षाची साथ सोडणार? 

तर दुसरीकडे आतापर्यंत दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या हर्षित राणाचे नावही चर्चेत आहे. तसेच, वरुण चक्रवर्ती आणि श्रेयस अय्यर यांची नावे देखील या यादीत समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी श्रेयस आणि इशान किशन यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळण्यात आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube