Download App

पाकिस्तानसोबत क्रिकेट नाही, बीसीसीआय घेणार ‘हा’ मोठा निर्णय

BCCI On Pakistan Cricket : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम  (Pahalgam) येथे  झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून (India) पाकिस्तानवर

BCCI On Pakistan Cricket : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम  (Pahalgam) येथे  झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून (India) पाकिस्तानवर (Pakistan) कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत 100 पेक्षा जास्ता दहशतवाद्यांना ठार मारले आहे.

तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असणारा सिंधू जल करार देखील रद्द केला आहे. तसेच भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढण्यात आले आहे. तर आता पाकिस्तानवर बीसीसीआय (BCCI) देखील कारवाई करण्याची तयारी करत आहे. माहितीनुसार, बीसीसीआय पाकिस्तानसोबत कुठल्याही लेव्हलवर क्रिकेट खेळण्यास नकार देणार आहे.

बीसीसीआयच्या या निर्णयानंतर महिला इमर्जिंग आशिया कप 2025 (Emerging Asia Cup 2025) स्पर्धा रद्द करण्यात आली असल्याची माहितीसमोर आली आहे. इमर्जिंग आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघही सहभागी होणार होते मात्र आता पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याने ही स्पर्धा रद्द करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. पुढील महिन्यात ही स्पर्धा होणार होती मात्र भारत या स्पर्धेत सहभागी होत नसल्याने ही स्पर्धा आता होणार नाही.

तर दुसरीकडे बीसीसीआयच्या या निर्णयाचा परिणाम पुरुषांच्या आशिया कप 2025 स्पर्धेवर (Asia Cup 2025) देखील होणार असल्याचा सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, या स्पर्धेबाबत अंतिम निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) बैठकीत घेतला जाणार आहे. माहितीनुसार, भारत या स्पर्धेत खेळणारही नाही आणि आयोजन देखील करणार नाही. बीसीसीआयने याबाबत माहिती एसीसीला दिली असल्याची देखील माहितीसमोर आली आहे.

टी-20 विश्वचषकाला फटका  

तर पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकात देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असल्याची माहितीसमोर आली आहे. ही स्पर्धा आयसीसीकडून आयोजित करण्यात येणार आहे मात्र तरीही देखील बीसीसीआय पाकिस्तानसोबत न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिष्टमंडळात कोणीही स्थानिक राजकारण आणू नये, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

22 एप्रिल रोजी झालेलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने पाकिस्ताविरोधात कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

follow us