Download App

‘इंडिया’ VS ‘भारत’ वादात वीरेंद्र सेहवागची उडी, थेट बीसीसीआयला सुनावले

India VS Bharat : विश्वचषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी श्रीलंकेसाठी संघाची घोषणा केली. यासोबतच बीसीसीआयनेही टीम सोशल मीडियावर शेअर केली आहे. BCCI ने लिहिले, 2023 च्या विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ असा आहे. पण भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला बीसीसीआयचे हे ट्विट आवडले नाही.

जर्सीवर ‘भारत’ असे लिहिले पाहिजे
सध्या देशात ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या नावावरून वाद सुरू आहे. यावर प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे. त्यात माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही उडी घेतली आहे. त्याने बीसीसीआयच्या ट्विटवर लिहिले, टीम इंडिया नाहीतर, टीम भारत. या विश्वचषकात जेव्हा आपण कोहली, रोहित, बुमराह, जड्डूचा जयजयकार करु तेव्हा आशा आहे की आपल्या हृदयात भारत असेल आणि खेळाडूंच्या जर्सीवर ‘भारत’ लिहिलेले असेल.

त्याने पुढे म्हटले की माझा नेहमीच असा विश्वास आहे की आपल्यामध्ये अभिमान जागृत करणारे नाव असावे.
आम्ही भारतीय आहोत, इंडिया हे ब्रिटीशांनी दिलेले नाव आहे आणि आमले मूळ नाव ‘भारत’ अधिकृतरीत्या परत मिळण्यास बराच काळ लोटला आहे. मी आग्रह करतो बीसीसीआय आणि जय शाह यांना की या विश्वचषकात आपल्या खेळाडूंच्या छातीवर भारत असेल.

World Cup 2023 : चमकदार कामगिरी करूनही निवडकर्त्यांचं मनं जिंकू न शकलेले पाच खेळाडू

इंडिया विरुद्ध भारत वाद काय आहे?
काँग्रेससह भारतातील अनेक विरोधी पक्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मिळून एक आघाडी केली आणि त्याला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स किंवा थोडक्यात I.N.D.I.A असे नाव दिले. येथूनच हा वाद सुरू झाला. सत्ताधारी पक्ष भाजपने याला विरोध केला आणि तेव्हापासून सर्वत्र इंडियाऐवजी भारत वापरला जात आहे.

Tags

follow us