India vs New Zealand : 19 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय भाारतीय संघात मोठा बदल केला आहे. बीसीसीआयने कुलदीप यादवला संघातून वगळले असून त्याच्या जागी आता वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला संघात स्थान देण्यात आले आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, पुरुष निवड समितीने 19 नोव्हेंबर 2026 पासून वेलिंग्टन (Wellington) येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी गुरनूर ब्रारचा (Gurnoor Brar) भारतीय संघात समावेश केला आहे. कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) कसोटी संघातून रिलीज करण्यात आले असून, तो आता भारतात सुरू असलेल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल.”
बीसीसीआयने (BCCI) ऋषभ पंतबाबतही (Rishabh Pant) माहिती दिली असून, त्यात म्हटले आहे की, “दरम्यान, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत वेलिंग्टनमध्ये कसोटी संघातील खेळाडूंशी येऊन सामील झाला आहे.” बोर्डाने पुढे स्पष्ट केले की, गुरनूर आता कसोटी संघात सामील होईल आणि तो पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध नसेल. शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी त्याच्या जागी अन्य कोणाचीही निवड केली जाणार नाही.
भारताचा अपडेटेड कसोटी संघ :
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार.
🚨 News 🚨
Gurnoor Brar added to #TeamIndia’s squad for #NZvIND Tests
More details on the squad updates ▶️ https://t.co/hYDKOnjK5e https://t.co/wz9kSubfzZ
— BCCI (@BCCI) November 14, 2026
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर धोका.., सुनेत्रा पवारांनी वरिष्ठ नेत्यांकडे स्पष्ट केली भूमिका
