ODI World Cup 2027 ‘या’ दिवसापासून सुरु होणार, 50 दिवस चालणार स्पर्धा; जाणून घ्या सर्वकाही

ODI World Cup 2027 : दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे होणाऱ्या 2027 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया

ODI World Cup 2027

ODI World Cup 2027

ODI World Cup 2027 : दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे होणाऱ्या 2027 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या संघांकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर आता ही स्पर्धा 2 ऑक्टोबर 2027 म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 21 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, 14 संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धे 50 दिवस चालणार आहे मात्र आतापर्यंत आयसीसीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सुरुवातीला ही स्पर्धा 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याची चर्चा होती.

क्रिकबझ ने दिलेल्या माहितीनुसार, शांतता आणि अहिंसेचे पुरस्कर्ते असलेल्या महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या विशिष्ट दिवशी स्पर्धेची सुरुवात करण्याची योजना आखत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकार असलेल्या गांधींनी दक्षिण आफ्रिकेत 21 वर्षे व्यतीत केली होती याच पार्श्वभूमीवर आयसीसीला भारताच्या ‘राष्ट्रपिता’ यांना आदरांजली वाहायची आहे.

ICC च्या नियोजनात बदल

सुरुवातीला आयसीसीची योजना 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने घेण्याची आणि 8 ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी विश्वचषक सुरू करण्याची होती. मात्र, आता ही स्पर्धा 2 ऑक्टोबरला सुरू होऊ शकते.

12 शहरांमध्ये होणार सामने

जोहान्सबर्ग येथे नुकत्याच झालेल्या एका समारंभात आयसीसीने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामधील 12 शहरांची यजमान शहरे म्हणून घोषणा केली. यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील आठ शहरे, झिम्बाब्वेमधील तीन शहरे आणि विंडहोक (नामिबियाची राजधानी) यांचा समावेश आहे.

विश्वचषकाच्या स्वरूपात बदल

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार विश्वचषकाच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. सर्वात कमी  रँकिंग असलेले तीन संघ ‘सुपर सिरीज’ (Super Series) नावाच्या एका ‘मिनी-लीग’मध्ये स्पर्धा करतील. ‘सुपर सिरीज’चा विजेता संघ इतर 11 संघांसोबत सामील होऊन एकूण 12 संघांचा ग्रुप तयार करेल आणि त्यानंतर या संघांची दोन ग्रुपमध्ये विभागणी केली जाईल. संघ आपापल्या ग्रुपमधील इतर संघांविरुद्ध सामने खेळतील. त्यानंतर ‘सुपर सेव्हन’ (Super Seven) टप्पा, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना खेळवला जाईल.

दिलासा, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामधील 12 शहरांमध्ये एकूण 54 सामने खेळवले जाणार आहेत. 2027 च्या विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, डर्बन, गेबेर्हा, म्बोम्बेला, केप टाउन, पार्ल आणि ब्लूमफॉन्टेन येथे सामने होतील. अंतिम सामना ‘वॉन्डरर्स’ किंवा ‘न्यूलँड्स’ यापैकी एका मैदानावर खेळवला जाईल. झिम्बाब्वेमधील हरारे, बुलावायो आणि व्हिक्टोरिया फॉल्स येथे सात ते दहा सामने होतील तर नामिबियातील विंडहोक तीन सामन्यांचे यजमानपद भूषवेल.

Exit mobile version