Download App

गोल्डन बॉय नीरज चोप्रा उद्या करणार कमाल, भारताला मिळणार पहिलं सुवर्णपदक

Olympics 2024 Schedule 13 Day  :  पॅरिस ऑलिम्पिकच्या (Olympics 2024) बाराव्या दिवशी निर्धारित वजन मर्यादेपेक्षा जास्त वजन

  • Written By: Last Updated:

Olympics 2024 Schedule 13 Day  :  पॅरिस ऑलिम्पिकच्या (Olympics 2024) बाराव्या दिवशी निर्धारित वजन मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्याने कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) महिला 50 किलो गटाच्या फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिने सेमीफायनल मॅच जिंकली तेव्हा तिचं वजन सुमारे 52 किलो होते आणि नंतर तिचं वजन 2 किलोने कमी करण्यासाठी तिने तिचं रक्त देखील काढले मात्र तरीही तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला या स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं.

तर दुसरीकडे  पॅरिस ऑलिम्पिकच्या तेराव्या दिवशी टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) पुरुषांच्या भालाफेक फायनलमध्ये सुवर्णपदकासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करताना दिसणार आहे. भालाफेक पात्रता सामन्यात  89.34 मीटर थ्रोसह नीरज चोप्राने अव्वल स्थान पटकावले होते. फायनलमध्ये नीरज चोप्रा डरसन पीटर्स, अर्शद नदीम, जेकब वडलेज आणि केशॉर्न वॉल्कोट विरुद्ध खेळणार आहे.

तर भारतीय पुरुष हॉकी संघ (Indian Men Hockey Team) स्पेनविरुद्धच्या कांस्यपदक सामना खेळणार आहे. उपांत्य फेरीत मंगळवारी जर्मनीविरुद्ध 2-3 ने भारताचा पराभव झाला होता.

भारताचे वेळापत्रक

गोल्फ

महिला : अदिती अशोक आणि दीक्षा डागर  (दुपारी 12.30 वाजता)

ऍथलेटिक्स

महिला : 100 मीटर हर्डल्स रिपेचेज राऊंड (ज्योती याराजी)  (दुपारी 2.05 वाजता)

पुरुष : भालाफेक फायनल : (नीरज चोप्रा)  (रात्री 11.55 वाजता )

कुस्ती

पुरुष : फ्रीस्टाइल 57 किलो (उपांत्यपूर्व फेरी) अमन सेहरावत  (दुपारी 2.30 वाजता)

महिला : फ्रीस्टाइल 57 किलो (उपांत्यपूर्व फेरी) अंशू मलिक  (दुपारी2.30 वाजता)

महायुतीची डोकेदुखी वाढणार, विधानसभेसाठी मविआ तयार, मुंबईत घेणार मेळावा

हॉकी

पुरुष (कांस्यपदक सामना): भारत विरुद्ध स्पेन: (संध्याकाळी 5.30 वाजता)

follow us