Download App

Paris Olympics 2024 मनू भाकर करणार पदकांची हॅटट्रिक? शानदार कामगिरी करत पुन्हा फायनलमध्ये

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय स्टार मनू भाकरने आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा फायनलमध्ये

  • Written By: Last Updated:

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympics 2024) भारतीय स्टार मनू भाकरने (Manu Bhakar) आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

25 मीटर पिस्तुल महिला स्पर्धेत मनूने दुसरे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत तिने 590-24 असा स्कोर करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता मनूला पदकांची हॅट्ट्रिक करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेत ईशा सिंग (Isha Singh) 18व्या स्थानावर राहिल्याने ती आता पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.

मनूचा अंतिम सामना 3 ऑगस्टला दुपारी 1 वाजता होणार आहे. यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल महिला आणि 10 मीटर मिश्र पिस्तूल प्रकारातही कांस्यपदक पटकावले आहे.

अजित पवारांना पुन्हा धक्का, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद पवार गटात करणार प्रवेश

पॅरिस ऑलिम्पिक्स स्पर्धेत मनू भाकरने दहा मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांनी कांस्यपदक पटकावले होते. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी देखील मनू भाकरने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. मनूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले होते.

follow us