Download App

भारतासाठी उद्याचा दिवस महत्वाचा, लोव्हलिना-लक्ष्य सेनकडे सर्वांचे लक्ष, जाणून घ्या वेळापत्रक

Paris Olympics Day 9 Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) आठवा दिवस भारतीय संघासाठी जरी चांगला नसला

  • Written By: Last Updated:

Paris Olympics Day 9 Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) आठवा दिवस भारतीय संघासाठी जरी चांगला नसला तरी रविवारी (4 ऑगस्ट) ऑलिम्पिकच्या नवव्या दिवस भारतासाठी महत्वाचा ठरणार आहे. कारण भारताला उद्या दोन पदक निश्चित करण्याची एक सुवर्णसंधी असणार आहे.

बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोरगोहेन (Lovelina Borgohen) आणि बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन (Lakshya Sen) भारतासाठी पदक निश्चित करू शकतात. तर भारतीय पुरुष हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनशी भिडणार आहे.

भारतीय स्टार खेळाडू लक्ष्य सेनचा सेमीफायनल सामना व्हिक्टर एक्सेलसेनशी होणार आहे. आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंमध्ये आठ सामने झाले आहे. त्यापैकी एक्सेलसेन 7 तर लक्ष्यने एका वेळा बाजी मारली आहे.

तर दुसरीकडे लोव्हलिनाला चीनच्या ली कियानचे आव्हान असणार आहे. जर लोव्हलिना हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली तर ती पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय संघासाठी कांस्यपदक निश्चित करेल. यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 75 किलो गटाच्या अंतिम फेरीत कियानविरुद्ध लोव्हलिनाला पराभव स्वीकारावा लागला होता.

पॅरिस ऑलिम्पिकच्या नवव्या दिवशी भारताचे वेळापत्रक

शूटिंग

पुरुष : 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल पात्रता (फर्स्ट स्टेज ), विजयवीर सिद्धू आणि अनिश (दुपारी 12.30 वाजता)

हॉकी

पुरुष : भारत विरुद्ध ब्रिटन, उपांत्यपूर्व फेरी: (दुपारी 1.30 वाजता)

ऍथलेटिक्स

महिला : 3000 मीटर स्टीपलचेस (फर्स्ट राऊंड) : पारुल चौधरी (दुपारी 1.35 वाजता)

पुरुष : लॉन्ग जम्प पात्रता: जेसन आल्ड्रिन (दुपारी 2.30 वाजता)

बॉक्सिंग

महिला : 75 किलो उपांत्यपूर्व फेरी (लोव्हलिना बोर्गोहेन विरुद्ध चीन) (दुपारी 3.02 वाजता)

बॅडमिंटन

पुरुष : एकेरी उपांत्य फेरी, (लक्ष्य सेन विरुद्ध डेनमार्क) (दुपारी 3.30 वाजता)

नौकानयन

पुरुष : डिंगी रेस (सात आणि आठ): विष्णू सरवणन (दुपारी 3.35 वाजता)

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या 13 मागण्या; CM शिंदेंनी वायुवेगाने फिरवली सूत्र

महिला : डिंगी रेस (सात आणि आठ): नेत्रा कुमनन (संध्याकाळी 6.05 वाजता)

follow us