Download App

भारताला आज पदक जिंकण्याची नामी संधी; जाणून घ्या, संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक

आज शुक्रवार स्पर्धेचा सातवा दिवस आहे. आजही भारतीय स्पर्धकांना जिंकण्याची संधी आहे. आज दिवसभरात भारतीय खेेळाडूंचे सामने आहेत.

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये गुरुवार भारतासाठी (Paris Olympics 2024) अतिशय निराशाजनक ठरला. दिवसाची सुरुवात पदकाने झाली पण दिवस संपता संपता निराशाच हाती आली. कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने नेमबाजीत (Swapnil Kusale) कांस्यपदकाची कमाई करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याच्याव्यतिरिक्त अन्य सर्व खेळाडू स्पर्धेतून बाद झाले. भारताची लोकप्रिय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हीला सुद्धा पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर आज शुक्रवार स्पर्धेचा सातवा दिवस आहे. आजही भारतीय स्पर्धकांना जिंकण्याची संधी आहे. आज दिवसभरात भारतीय खेळाडूंची किती सामने आहेत त्याची माहिती घेऊ या…

अॅथलेटिक्स

पुरुष गोळाफेक पात्रता फेरी
वेळ – रात्री 11.40 पासून

बॅडमिंटन

पुरुष एकेरी (लक्ष्य सेन, एचएस प्रणोय)
वेळ – सायंकाळी 6.30

शेतकऱ्याचं पोर ते धोनीप्रमाणे रेल्वेत TC; भारताला कास्य जिंकून देणाऱ्या स्वप्नीलचा प्रेरणादायी प्रवास

सेलिंग

पुरुष डिंघी तिसरी व चौथी शर्यत (विष्णू सर्वानन)
वेळ – रात्री 7.05

महिला डिंघी तिसरी व चौथी शर्यत (नेत्रा कुमानन)
वेळ – दुपारी 3.45

रोविंग

पुरुष सिंगल स्कल्स अंतिम फेरी (बलराज पन्वर)
वेळ – दुपारी 1.48

ज्युडो

महिला 78 किलोपेक्षा जास्त (तुलिका मान)
वेळ – दुपारी 1.30

माद्रित स्पेन मास्टर्समध्ये PV Sindhu ची विजयाकडे वाटचाल; उपांत्य फेरीत तैपेईच्या खेळाडूचा पराभव

नेमबाजी

महिला 25 मीटर पिस्टल पात्रता (मनू भाकर, इशा सिंग)
वेळ – दुपारी 12.30

गोल्फ

पुरुष दुसरी फेरी (शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर)
वेळ – दुपारी 12.30

हॉकी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
वेळ – दुपारी 4.45

follow us