Download App

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आणखी एक मेडल; नित्या श्रीसिवन कांस्यपदकाची मानकरी

बॅडमिंटनपटू नित्या श्रीसिवन हीने (Nitya Sre Sivan) या स्पर्धेतील सामन्यात कांस्यपदकाची कमाई केली.

Paris Paralympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची निराशाजनक कामगिरी पॅरालिम्पिक खेळाडू (Paris Paralympics) भरून काढत आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आताही बॅडमिंटनपटू नित्या श्रीसिवन हीने (Nitya Sre Sivan) या स्पर्धेतील सामन्यात कांस्यपदकाची कमाई केली. महिलांच्या सिंगल एसएच6 इव्हेंटमध्य नित्याने इंडोनेशियाच्या रिना मार्लिना हीचा पराभव केला. सामन्यातील स्ट्रेट गेममध्ये 21-14 आणि 21-6 अशा फरकाने तिने मार्लिनाचा पराभव करत पदकावर नाव कोरलं.

Paris Paralympics 2024 मध्ये भारताची कमाल, मनीषाने रचला इतिहास, 11 पदकांवर मोहर

नित्या श्रीसिवनने या सामन्यात एकतर्फी कामगिरी केली. फक्त 23 मिनिटांचा वेळ घेतला. पहिल्या गेममध्ये तिने 21-14 अशी आघाडी घेतली होती. तिच्याकडे 14 कांस्यपदक पॉइंट्स होते. पदक जिंकण्यासाठी फक्त एका पॉइंटची गरज होती. तिने हा पॉइंट मिळवत कांस्यपदकावर नाव कोरलं. अशा पद्धतीने भारताच्या खात्यात आणखी एक मेडल जमा झालं.

 

follow us