Pat Cummins : क्रिकेट लीगच्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली यंदा लागली आहे. पॅट कमिन्सला हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) पॅट कमिन्सचा (Pat Cummins) काही मिनिटांत विक्रम मोडला आहे. दिल्लीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर पहिली बोली लावली. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. अखेर कोलकाताने स्टार्कला 24.75 कोटींना विकत घेतले.
स्टार्कला विकत घेण्यासाठी गुजरात आणि कोलकाता यांच्यात दीर्घ स्पर्धा होती. गुजरातने 24.50 कोटींची शेवटची बोली लावली. पण यापेक्षा जास्त बोली लावून कोलकाताने स्टार्कला विकत घेतले. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यावेळी तो क्रिकेट लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पॅट कमिन्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, त्याच्यासाठी हैदराबाद आणि बंगळुरु यांच्यात चुरस झाली.
स्टार अष्टपैलू पॅट कमिन्स सध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने यंदाचा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.
बंगळुरु आणि हैदराबाद यांच्यात चुरस झाली
पॅट कमिन्सची बोली 2 कोटी रुपयांपासून सुरू झाली होती. हैदराबादने त्याच्यासाठी पहिली बोली लावली आणि नंतर बंगळुरू या बोलीमध्ये सामील झाले. हैदराबादने पॅट कमिन्ससाठी आपली बोली सोडली नाही आणि शेवटी त्याला 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले.
T20 League : धोनी कोणावर लावणार कोट्यवधींची बाजी? जाणून घ्या, पडद्यामागच्या लिलावाचा खेळ
पॅट कमिन्सने क्रिकेट लीगमध्ये केवळ 42 सामने खेळले आहेत, त्याच्या नावावर 379 धावा आहेत आणि त्याने केवळ 45 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच साधारण सरासरी असतानाही पॅट कमिन्सवर एवढा पैसा बरसला आहे, अशा स्थितीत हैदराबादने मोठा जुगार खेळला आहे, असे म्हणता येईल.
आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू
24.75cr – मिचेल स्टार्क (कोलकाता,2023)*
20.50cr – पॅट कमिन्स (हैदराबाद, 2024)*
18.50cr – सॅम करन (पंजाब, 2023)
17.50cr – कॅमेरॉन ग्रीन (मुंबई, 2023)
16.25cr – बेन स्टोक्स (चेन्नई, 2023)
16.25 कोटी – ख्रिस मॉरिस (राजस्तान, २०२१)
16.00 कोटी – युवराज सिंग (दिल्ली, 2015)
16.00cr – निकोलस पूरन (लखनऊ, 2023)
15.50cr – पॅट कमिन्स (कोलकाता , 2020)
हैदराबाद : एडन मार्कराम, अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, मार्को जॅन्सन, वॉशिंग्टन सुंदर, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, फझलहक फारूकी, टी नटराजन, उमरान मलिक, मयंक मार्कंडे, शाहबाज अहमद.