T20 League : दुबईत लिलावाला बंपर सुरूवात; कॅरेबियन संघाच्या बड्या खेळाडूसाठी राजस्थानने ओतले 7.40 कोटी
T20 League : टी20 क्रिकेट स्पर्धांसाठी आज दुबईत खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली. लिलावात पहिलाच (T20 League) खेळाडू राजस्थान संघाने मोठी बोली लावून खरेदी केला. रोव्हमन पॉवेलने त्याच्यासाठी एक कोटींची बेस प्राइस निश्चित केली होती. मात्र राजस्थानने त्याच्यासाठी 7.40 कोटी रुपये खर्च करून त्याला संघात घेतले. या स्पर्धांसाठी लिलाव सुरू झाल्यानंतर विकला जाणारा पॉवेल हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यानंतर लिलाव वेगाने पुढे सरकत असून खेळाडू खरेदी करण्यासाठी फ्रँचायझी कोट्यावधींची बोली लावत आहेत.
स्टीव्ह स्मिथ, मनीष पांडे अनसोल्ड
या लिलावात धडाकेबाज कामगिरी करणारा मनीष पांडे, करुण नायर आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड राहिले. म्हणजेच त्यांना एकाही संघाने विकत घेतले नाही. या फलंदाजांचे आता करिअरही संपुष्टात आल्याचे दिसत आहे. स्टीव्ह स्मिथने याआधी याच पुणे आणि राजस्थान संघाचं नेतृत्व केलं होतं. पण आता याच स्टीव्हला आपल्या संघात घेण्यास एकाही संघाची तयारी दिसत नाही. तसेच राइली रुसो यालादेखील एकाही संघाने खरेदी केले नाही.
IND vs SA: टीम इंडियाला धक्का, इशान किशनही कसोटी मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला लागली ‘लॉटरी’
हैदराबादच्या ताफ्यात ‘हेड’, 6 कोटी 8 लाखांत केले खरेदी
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करून भारताच्या हातातून सामना हिसकावणारा ट्रॅव्हिस हेडला हैदराबादने संघात घेतले आहे. हेडने त्याची बेस प्राइस दोन कोटी रुपये ठेवली होती. त्याच्यासाठी चेन्नई आणि हैदराबाद संघात जोरदार स्पर्धा सुरू होती. अखेर हैदराबादने 6 कोटी 8 लाख रुपयांची बोली लावत हेडला खरेदी केले.
हॅरी ब्रुकला मिळाले चार कोटी
मागील वर्षात हैदराबादच्या संघात असलेल्या हॅरी ब्रुकने यावेळच्या लिलावासाठी त्याची मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवली होती. त्याला खरेदी करण्यासाठी राजस्थान आणि दिल्ली या दोघांनी बोली लावली. दिल्लीने बाजी मारत ब्रुकला 4 कोटींना खरेदी केली.
किती लावली जाणार बोली?
दुबईमध्ये आज होणाऱ्या 333 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. ज्यामध्ये सर्व संघ मिळून 262.95 कोटी रुपये खर्च करू शकतील. जरी बोली 333 खेळाडूंवर लावली जाणार असली तरी, लिलावात जास्तीत जास्त 77 खेळाडूंसोबतच करार करू शकणार आहे.