PM Modi letter to R Ashwin : माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे पंतप्रधानांनी अश्विनला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. ज्यावेळी प्रत्येकजण अधिक ऑफ ब्रेकची अपेक्षा करत होता, त्यावेळी तू कॅरम बॉल टाकला ज्याने सर्वांनाच चकित केलं. (R Ashwin) लोक जर्सी नंबर 99 मिस करतील. अश्विनने 18 डिसेंबर रोजी गाबा कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली.
संन्यास घेतला की दिला? अश्विनच्या अचानक निवृत्तीमुळे अनेक चर्चांना उधाण
अश्विनच्या अचानक निवृत्तीवर पीएम मोदी म्हणाले की, तुझ्या निवृत्तीने भारतासह जागतिक क्रिकेटमधील चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आम्ही सर्व आणखी ऑफ ब्रेकची वाट पाहत होतो आणि तु कॅरम बॉल टाकून ते टाळले. हा निर्णय घेणे सोपे गेले नसावे. विशेषतः जेव्हा तू भारतासाठी चांगली कामगिरी करत होतास.
मोदींनी लिहिले की, 2022 टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या चेंडूवर मारलेल्या तुझ्या शॉटला खूप टाळ्या मिळाल्या. ज्या पद्धतीने तुम्ही बॉल सोडला, तो वाइड बॉल बनू दिला, त्यामध्ये तुझा शहाणपणा दिसतो. तसंच, पंतप्रधान म्हणाले, तुमच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तू फिल्डवर परतला तो क्षण आम्हा सर्वांना आठवतो. तसंच, जेव्हा चेन्नईमध्ये पूरस्थिती होती आणि तू कुटुंबाशी संपर्क साधू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तुम्ही ज्या प्रकारे खेळला ते या खेळाप्रती बांधिलकी दर्शवते.
अश्विनच्या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी त्याचे कौतुक केले. त्यांनी लिहिले की, तुझ्या विकेट्स, धावा आणि सगळ्यात जास्त प्लेअर ऑफ द सीरीज ट्रॉफीचा संघाच्या यशात मोलाचा वाटा आहे. पदार्पणाच्या कसोटीतच तू 5 विकेट घेतल्या. एकदिवसीय विश्वचषक-2011, चॅम्पियन्स ट्रॉफी-2013 आणि ICC क्रिकेटर ऑफ द इयर यासारख्या कामगिरीने तुला भारतीय संघाचे महत्त्वाचे सदस्य बनवले. जर्सी क्रमांक 99 ची अनुपस्थिती लोकांना नेहमीच जाणवेल. जेव्हा तू क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवला तो क्षण क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहतील.
2021 मध्ये सिडनी कसोटीतील तुमची मॅच सेव्हिंग इनिंगने देशाला संस्मरणीय क्षण दिले. लोक तुला अनेक सामन्यांसाठी लक्षात ठेवतात. 2022 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या T20 सामन्यात ज्या प्रकारे तू बॉल सोडून मनाची उपस्थिती दर्शवली होती ती आश्चर्यकारक होती आणि तुझ्या विजयी शॉटने तो सामना आमच्या आठवणींमध्ये कोरला आहे.
रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द
रविचंद्रन अश्विनने 2010 ते 2024 दरम्यान देशासाठी एकूण 287 सामने खेळले. दरम्यान, त्याला 379 डावात 765 विकेट्स मिळाले. देशासाठी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 537, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 156 आणि टी-20मध्ये 72 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने फलंदाजी करताना 233 डावात 4394 धावा